
सहसंपादक: रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील
उमरविहीरा येथील महिला शेतकरी शालुबाई उर्फ शालुरंगा अमित्र पवार वय ५० वर्ष ही महिला सकाळी शेतात निंदण करण्याकरीता गेली असता पुर्ण शेतातील कपाशीचे पिक हे रोह्यांनी खाऊन दिसले असता वनविभागाच्या संतापाने दिं १२ ऑगष्ट २०२३ ला सकाळी आठ वाजताच्या सुमारास शेतकरी महीलीने शेतातच विषप्राशान करुन आत्महत्या केल्याची घटना घडली ही महीला शेतातुन जेवन करण्याकरीता घरी उशिरा पर्यँय आली नसल्याने शालुबाई पवार यांच्या घरातील नातेवाईक शेतात गेले असता शालुबाई ही विषप्राशान करुन मृत अवस्थेत पडुन दिसली सदर घटनेची माहिती वडकी पोलिस स्टेशनचे ठानेदार विजय महाले यांना मिळताच वडकी पोलिस स्टेशनचे ठानेदार विजय महाले यांना तातडीने सावरखेडा बिट जमादार यांना अरून भोयर व आकाश कुंदुसे यांना घटनास्थळी पाठविले सदर घटनेचा घटनास्थळी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदानाकरीता करंजी ग्रामिण रुग्नालयात पाठविण्यात आले पुढील तपास सुरू आहे.
