
.
सहसंपादक : रामभाऊ भोयर
शहराच्या अवतीभवती गेल्या काही वर्षांत अनेक लेआउट उभे राहिले असून, काही ठिकाणी अजूनही घरबांधणी सुरू आहे. अशाच वर्धा रोडवरील माऊली पार्क लेआउट मध्ये आता चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. या ठिकाणी रात्रीच्या वेळी मद्यपींची गर्दी होत असून, अल्पवयीन विद्यार्थीही सिगारेट व दारूच्या व्यसनात गुंतताना दिसत आहेत.
सकाळच्या वेळेस मॉर्निंग वॉकसाठी जाणारे नागरिक सांगतात की, रस्त्यावर दारूच्या बाटल्या, सिगारेटचे पाकिटे, बिसलरी बाटल्या अशा स्वरूपात कचरा दिसतो. या ठिकाणी रात्रीच्या सुमारास तरुण मंडळी दारूचा आस्वाद घेत बसतात आणि नंतर बाटल्या रस्त्यावर फेकून परिसर अस्वच्छ करतात.मॉर्निंग वॉकला जाणारे ज्येष्ठ नागरिकांचा ग्रुप आणि स्थानिक रहिवासी यांनी या प्रकाराविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, “माऊली पार्क परिसरात रात्री सात ते आठच्या दरम्यान पोलिस पेट्रोलिंगची गाडी फिरली, तर असे प्रकार थांबू शकतात.”
नागरिकांनी राळेगाव पोलिसांना या गोष्टीकडे गंभीरतेने लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. तसेच पालक वर्गानेही आपल्या मुलांवर लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले.
