एस. एम जोशी सोशालिस्ट फाऊंडेशन पुणे यांचा माधुरी खडसे- डाखोरे यांना पुरस्कार

सहसंपादक: रामभाऊ भोयर

राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी समारोह समिती द्वारा आयोजित सामाजिक – आर्थिक न्याय परीषद नागपूर येथे दी.११ मार्च २३ ला परिषदेचे उद्घाटक मा. उत्तम कांबळे ज्येष्ठ पत्रकार, सुप्रसिद्ध विचारवंत नाशिक, मा. सुभाष लोमटे,सचिव एस एम जोशी सोशलिस्ट फाऊंडेशन पुणे, विलास भोंगाडे सामाजिक कार्यकर्ता यांचे उपस्थीतीत मा. ज्ञानेश्वर रक्षक व डॉ अन्वर सिद्दीकी यांचे हस्ते माधुरी खडसे – डाखोरे, सचिव प्रेरणा ग्राम विकास संस्था, राळेगाव यांना एस.एम. जोशी सोशालिस्ट फाऊंडेशन द्वारा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
गेल्या विस वर्षा पासुन संस्थेच्या कार्यक्षेत्रात महीला सक्षमीकरण, महीला संघटन, महिलांचे आरोग्य, एकल महिलांचा सन्मान व अधिकार, शेतकरी महिलां सोबत सेंद्रिय शेती, महिलांचा जल,जंगल व जमिनीवरील अधिकार, जैविक ऊर्जा ई. विषयाला घेऊन ग्रामीण व आदिवासी मधे कार्य करीत आहे.