
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव विधानसभा मतदार संघात बाहेरचे विविध उमेदवारांनी धुमाकूळ घातला आहे. मनसे द्वारे जनतेच्या विविध न्याय मागण्याना वाचा फोडण्याचे मोठे काम इथे झाले. या विधानसभा मतदार संघात आता मनसे दमदार उमेदवार देणार असा सूर अमरावती येथील आढावा सभेतुन समोर आला. मनसे अध्यक्ष सन्मा. राजसाहेब ठाकरे अमरावती येथे विदर्भ दौऱ्यावर असून विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यातील मतदारसंघाचा आढावा आज राजसाहेबांनी घेतला. यावेळी यवतमाळ जिल्ह्यातील विविध मतदरसंघांचा आढावा घेत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत विविध विषयांच्या अनुषंगाने चर्चा देखील करण्यात आली. तसेच यावेळी राळेगांव विधानसभेतील कापसाच्या/सोयाबिनच्या भावाचा मु्द्दा, पिक विमा, एमआयडीसीचा मुद्दा, बेरोजगार तरूणांना रोजगारांचा मुद्दा, घरकूल लाभार्थ्यांचे थकीत रक्कम, व इतर समस्या मनसे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट यांच्या कडून सन्मा. राजसाहेबांनी जाणून घेतल्या.
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना राळेगांव विधानसभा क्षेत्राला एक सक्षम उमेदवार देनार असे सन्मा राजसाहेबांनी आवर्जून सांगितले.
