
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यात झालेल्या मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्याने चिखली येथील ग्रामपंचायत समोर पाणीच पाणी साचले असून पहिल्याच पावसात ग्रामपंचायतची पोलखोल झाल्याचे चित्र समोर आले आले असून याकडे ग्रामपंचायत चे दुर्लक्ष दिसून येत आहे.
चिखली गावात प्रवेश करताना सुरुवातीलाच ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतीच्या समोर खूप मोठे पाणी साचले आहे तसेच ग्रामपंचायत समोर नालीवर असलेल्या पुलावर दीड ते दोन महिन्यापासून मोठे भगदाड पडले आहे या भगदाडामुळे अपघात होण्याची शक्यता बळावली आहे अचानकपणे अपघात झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न गावकरी उपस्थित करीत आहेत दोन महिन्यापासून पडलेले ग्रामपंचायत समोरील नालीवर भगदाड अद्यापही बुजवले नसल्याने याकडे ग्रामपंचायत चे सपशेल दुर्लक्ष दिसून येत असल्याने ग्रामपंचायत च्या कामकाजावर गावातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे तसेच गावातील मान्सून पूर्व नाल्या साफसफाई ची कामे अद्यापही पूर्ण झाले नसल्याने सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या तुडूंब भरलेल्या दिसून येत आहे. मात्र ग्रामपंचायत ने अद्यापही नाली सफाईची कामे केलेली नाही .
गावातील मूलभूत समस्यांची पूर्तता करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ग्रामपंचायतीकडे जबाबदारी आहे मात्र लोकप्रतिनिधीच्या वेळ काढू धोरण व उदासीनता यामुळे गावातील अनेक समस्या कायम आहेत गावातील नागरिक अनेकदा ग्रामपंचायत प्रशासनाच्या समस्यांचा पाढा वाचून दाखवतात मात्र याकडे ग्रामपंचायत प्रशासन कानाडोळा करीत असल्याचे गावकऱ्यांकडून सांगितले जात आहे.
