
सहसंपादक : रामभाऊ भोयर
नवरात्रोत्सवाला उत्सवाला २२ सप्टेंबर २०२५ रोज सोमवारपासून सुरुवात झाली असून, राळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत १३६ दुर्गादेवीची मूर्तीची स्थापना करण्यात आली यामध्ये शहरात ३४ तर ग्रामीण भागात १०२ दुर्गादेवीची स्थापना करण्यात आली आहे.त्यानंतर शारदा देवीची स्थापना होणार असून त्यापैकी एक शहरी तर सात ग्रामीण भागात शारदा देवी स्थापना होणार आहे.
२८ गावांमध्ये ‘एक गाव, एक दुर्गा मंडळ’ या संकल्पनेतून दुर्गा स्थापना झाली असून त्यानंतर ८ गावात एक गाव एक शारदा देवीची स्थापना होणार आहे.
दुर्गा उत्सवाला सोमवार पासून सुरुवात झाली असून नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण तालुक्यात जय माता दी च्या जयघोषात भक्तिमय आणि उत्साही वातावरण निर्माण झाले आहे.
गावागावात उत्साहाची रंगत
तालुक्यातील सर्व दुर्गा उत्सव मंडळांनी गणेशोत्सव प्रमाणेच दुर्गा उत्सव देखील ध्वनी प्रदूषण टाळून पारंपारिक वाद्याच्या साह्याने साजरा करावा तसेच दुर्गा उत्सव शांततेत पार पडावा यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे जनेकरून कोणत्याही प्रकारचे वाद उद्भवणार नाही याची काळजी घ्यावी असे पोलीस प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले असून पोलीस प्रशासनांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
शितल मालटे
पोलीस निरीक्षक राळेगाव
