
तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225)
आज दि 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून दारव्हा तालुका काँग्रेस कमिटी (काँग्रेस भवन) कार्यालयात शहर महिला काँग्रेस कमिटी च्या अध्यक्षा श्रीमती रेखाताई निर्मळ यांच्या अध्यक्षतेखाली,सौ.शिवमालाताई प्रकाशराव नवरंगे मा.जिल्हा परिषद सदस्या यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील काँग्रेस पक्षाच्या महिलाची बैठक होऊन सौ.सोनालीताई शैलेंद्रजी घाटे यांची दारव्हा शहर उपाध्यक्ष पदी,सौ.मायाताई सुभाषराव गुल्हाने यांची दारव्हा शहर महिला काँग्रेस कमिटी च्या उपाध्यक्ष पदी,कु. एडवोकेट, भाग्यश्रीताई वसंतराव सवाई दारव्हा शहर महिला काँग्रेस कमिटी च्या सचिव पदी,तर दारव्हा तालुका महिला काँग्रेस कमिटी च्या उपाध्यक्ष पदी श्रीमती सुनिताताई गुणवंतराव गजभार रा.दारव्हा यांची नियुक्ती, तर सौ.दर्शनाताई शिध्दार्थ सोनोने रा.दारव्हा यांची सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली असुन त्यांना श्रीमती रेखाताई निर्मळ अध्यक्षा शहर महिला काँग्रेस कमिटी,व सौ,शिवमालाताई प्रकाशराव नवरंगे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले, संचालन लाला पांडे,प्रास्ताविक प्रकाश नवरंगे अध्यक्ष दारव्हा तालुका काँग्रेस कमिटी,आभार अनिल लोथे यांनी मानले, कार्यक्रमास श्री शैलेंद्र घाटे, सुभाषराव गुल्हाने, वसंतराव सवाई, शिध्दार्थ सोनोने, प्रेम गजभार, अशोकराव देशमुख, रामभाऊ ठाकरे, शिवनारायण जयस्वाल,हैदरअली,महम्मद मतानुसार,सुनिल मेश्राम, सोहेबभाई, जमन काझी,अतुल राऊत,देवेंद्र चव्हाण,मोहन तिरमारे,जावेद,कटके सर,भारत सावळे,शतीष बागल सह काँग्रेस पक्षाचे बहुतांश संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
