सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव शहरातील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे विद्यार्थी सेना प्रमुख रोषन ईरपते यांचा अनेक युवकांसमवेत काँग्रेस पक्षात प्रवेश झाला. यवतमाळ जिल्हा काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल मानकर माजी शिक्षण मंत्री प्रा. वसंत पुरके यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना विद्यार्थी सेनेच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाच्या राळेगाव येथील पक्ष कार्यालयात पक्ष प्रवेश झाला.
रोषन ईरपते हे सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात, युवकांच मोठ्या प्रमाणात संघटन त्यांच्या जवळ आहे. यावेळी काँग्रेस पक्षाचे ओ.बी.सी. सेलचे जिल्हाध्यक्ष अरविंद वाढोनकर, राळेगाव नगर पंचायतचे उपाध्यक्ष जानराव गिरी, तालुका अध्यक्ष राजु तेलंगे, शहर अध्यक्ष प्रदिप ठुने, कांग्रेस पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष अरविंद फुटाणे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मिलिंद इंगोले उपस्थित होते.
प्रवेश करणाऱ्यांमध्ये विद्यार्थी सेनेचे नितिन नेहारे, घनश्याम शिंदे, गजानन तिवसे, प्रकाश तिवसे, संदिप गेडाम, धनराज चमलाटे, सागर सोनतापे, शुभम सावरकर, अमोल अवतारे, प्रफुल ईरपते, रोहीत राऊत, अभी बतुलवार, प्रज्वल भाजपाले, भोला ईरपते, दिनेश किन्हेकर, हर्षल शेंडे, हर्षल कोवे हर्षल अंकतवार यांच्या सह अनेक तरुण उपस्थीत होते.