
रोहित्र जळाल्याने १० ते १५ शेतकरी ओलिता पासून वंचित रोहित्र बदलून न दिल्यास आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथिल शेतकरी वडकी येथिल वीज पुरवठा सहायक अभियंता गीरी यांच्या दुर्लक्ष धोरणामुळे ओलिता पासून वंचित. सविस्तर वृत्त असे रिधोरा येथिल एका शेत शिवारात असलेलं रोहित्र जळाल्याने १० ते १५ शेतकरी ओलिता पासून वंचित राहत आहे. या बाबत वडकी वीज वितरण कार्यालयाचे सहायक अभियंता गीरी यांच्या कडे रिधोरा येथिल शेतकरी यांनी तोंडी तक्रार केली होती सदर त्यांना असे सांगण्यात आले होते की तुम्हाला दोन दिवसांत रोहित्र बदलून देण्यात येईल सदर शेतकऱ्यांनी त्या अभियंत्यावर विस्वास ठेवून संपूर्ण शेतकरी घरी परत आले होते परंतु काही वेळानी त्यांच अभियंत्यांनी असे सांगितले की तुम्ही बील भरले तरच तुमचे रोहित्र बदलून देण्यात येईल परंतु या रोहित्र्यावरुन १० ते १५ शेतकऱ्यांचे ओलित चालू होते कुणी गहू तर कुणी चंना तर कुणी तुर पराटीला ओलित करत होते परंतु अचानक रोहित्र जळाल्याने संपूर्ण पीक मरण्याच्या अवस्थेत दिसून येते आहे. सदर या बाबत पुन्हा येथिल शेतकऱ्यांनी वडकी वीज पुरवठा सहायक अभियंता यांच्या कडे लेखी तक्रार दाखल केली होती परंतु अजूनही रोहित्र बदलून दिले नाही. तर एका आठवड्यातुन तीन दिवस सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत तीन फेज लाईन दिली जाते तर चार दिवस रात्री अकरा ते सकाळी आठ वाजेपर्यंत तीन फेज लाईन दिली जाते परंतु रात्री ओलित करत असताना अचानक जंगली डुक्कराने किंवा सरपटणारे जीव जंतू या मुळे शेतकरी किंवा शेतमजूर यांना कमी अधिक झाल्यास याला जबाबदार कोण? किंवा रात्री लाईट मध्ये काही बिघाड झाल्यास शेतकऱ्यांनी कुणा कडे तक्रार दाखल करायची जर का संबंधित लाईन मन किंवा अभियंत्यांना जर शेतकऱ्यांनी फोन केला की सर लाईट का बंद तर त्यांना उलट सुलट बोलुन फोन बंद करून ऑफिस टाईमला फोन करा असे सांगितले जातात मग यांना ऑफिस टाईम आहे तर शेतकऱ्यांना तीन फेज लाईन देण्याचा टाईम रात्रीच का ? शेतकरी तर जगाचा पोशिंदा म्हणून ओळखल्या जातात शेतकरी जगला तर तुम्ही जगाल असा प्रश्न येथिल शेतकरी उपस्थित करतं आहे.सदर रिधोरा सह परिसरातील अनेक तक्रारी या वडकी वीज पुरवठा कार्यालयाकडे आहे तर कुणी मोर्चे सुध्दा या कार्यालयावर नेले आहे. तर मनसे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट यांच्या नेतृत्त्वाखाली संबंधित अधिकाऱ्यांना लेखी निवेदन सुध्दा देण्यात आले आहेत परंतु वडकी वीज पुरवठा कार्यालयाचे सहायक अभियंता गीरी यांना अजुनपर्यंत जाग का आली नाही ? या नाकमुजर अभियंत्यांना कुनाचे पाठबळ? हा सहायक अभियंता जेव्हा पासून रुजू झाला तेव्हा पासून वडकी वीज पुरवठा नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहेत परंतु इतक्या साऱ्या तक्रारी यांच्या विरोधात असुन सुद्धा कुठल्याही प्रकारची कार्यवाही होतांना दिसत नाही. सदर रिधोरा येथिल शेतकऱ्यांचे अंकुर लेले गहु , चंना पाण्या अभावी जळुन खाक झाले तर याला जबाबदार वडकी वीज पुरवठा सहायक अभियंता गीरी राहिलं व चार ते पाच दिवसांत रोहित्र बदलून दिले नाही तर आम्ही सर्व खालिल शेतकरी वडकी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर अमरण उपोषणाला बसणार असल्याचे येथील शेतकरी प्रविण कोकाटे,गनेश लेनगुरे, दिनकरराव गुरनुले, बाबाराव निकुडे, हनुमान गाडगे,गजु लांभाडे, दिनेश लांभाडे, राजेंद्र काडुरवार,कीशोर ठेंगणे, मुरलीधर ठेंगणे,राजु ठेंगणे, विठ्ठलराव गाऊत्रे, तुळशीराम लोनबले, विनोद गाऊत्रे, अरुण गाडगे यांनी सांगितले आहे बील भरले नाही म्हणून का आम्हाला ओलिता पासून वंचित ठेवणारा का साहेब आधीच आम्हाला अती पावसाने झोडपले होते तर त्यामधून आम्ही कसं तरी बाहेर निघालो होतो तर परतीच्या पावसाने दगा दिला आहे. म्हणून आम्ही ओलिताच्या मागे लागलोय परंतु वडकी येथिल वीज पुरवठा सहायक अभियंता गीरी यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे आम्हाला ओलिता पासून वंचित राहावे लागत आहे.
