राळेगाव न्यायालयात छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा

सहसंपादक : रामभाऊ भोयर

वि. दिवाणी व फौजदारी न्यायालय राळेगाव येथे छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन व्यसनमुक्ती पोस्टर प्रदर्शन व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष न्या.यु.एम.पाटील साहेब यांनी वैयक्तिक विकासाबरोबरच सामाजिक विकास निर्व्यसनी राहून करण्याचा विचार व्यक्त केला. न्या. डि.आर.कुलकर्णी साहेब यांनी कौटुंबिक जीवन व्यसनमुक्त राहून समाज विकसित व्हायला वेळ लागणार नाही, असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमात ॲड.मधूसुदन अलोणे,ॲड.किशोर मांडवकर, ॲड. रोशनी वानोडे, ॲड. आकाश कवडे, ॲड. रूपेश सागरकर, ॲड. वैभव पंडित, ॲड. दीपक जुमनाके,ॲड.गायञी बोरकुटे, ॲड. वैष्णवी मुके, ॲड. योगेश ठाकरे, ॲड. धुपे, उपस्थित होते. तसेच न्यायालयिन कर्मचारी, तालुका विधी सेवा समिती राळेगाव, व वकील संघ, अटर्णी तसेच नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांचे संयुक्त उपस्थितीतुन कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व व्यसनमुक्ती शपत ॲड. रोशनी वानोडे (सौ कामडी) नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यवतमाळ जिल्हा संघटक यांनी केले तर आभार प्रदर्शन ॲड. आकाश कवडे यांनी केले.