


प्रतिनिधी:कल्पक ढोरे, वरोरा
वरोरा तालुक्यातील एकमेव कोरोना टेस्टिंग सेंटर असल्याने तालुक्यातील नागरिक सकाळी 6 वाजता पासून कोविड सेंटर च्या बाहेर रंग लावून उभे असतात .त्यांमुळे भलीमोठी रांग लावून नागरिक उभे असतात त्यात वयोवृद्ध ,तरुण ,महिला सर्व एकाच रांगेत उभे राहत ताटकळत उभे राहतात.
कोविड सेंटर मध्ये कोणत्याही प्रकारची सोशल डिस्टनसींग पाळण्यात येत नाही.काल आलेल्या नागरिकांचा नंबर आज घेत असल्याने वाद वाढत आहे .संपूर्ण वरोरा तालुक्याचा भार एकाच कोविड सेन्टर वर असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे वरोरा तालुक्यात कोरोना टेस्टिंग साठी केंद्र वाढविण्यासाठी नागरिकांकडून मागणी होत असताना स्थानिक प्रतिनिधी नि याकडे गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे .
