
राळेगाव तालुक्यातील सराटी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत वरध केंद्राची सन 2024-2025 या शैक्षणिक सत्रातील शेवटची शिक्षण परिषद दिनांक 29-4-2025 रोज मंगळवारला संपन्न झाली.या सभेत सर्वप्रथम क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले नंतर कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.या सभेत मागील शिक्षण परिषदेचा आढावा केंद्र प्रमुख हरिदास वैरागडे सरांनी घेऊन प्रास्ताविक केले. सोबतच या कार्यक्रमाचे औचित्य साधून वरध केंद्रातील घुबडहेटी या जिल्हा परिषद शाळेच्या दिर्घ सेवेनंतर या 30/4/2025 रोजी सेवानिवृत्त होत असलेले मुख्याध्यापक जयवंतराव काळे सरांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात सुभाष चव्हाण सर आणि विनोद मेंढे सरांनी आपले मनोगत व्यक्त केले. या सत्काराला उत्तर देताना जयवंतराव काळे सरांनी आपल्या सेवेतून आलेले अनुभव व्यक्त केले.त्याच कार्यक्रमात विद्यार्थी गुणवत्ता विकास कार्यक्रमाअंतरर्गत PAT/3संकलित मुल्यमापन आढावा या विषयावर सुभाष चव्हाण सरांनी माहिती दिली. सोबतच जगातील 2आनंदी देश भूतान व फिनलॅंडच्या शिक्षणपद्धतीवर भाष्य करत गुणवत्ता विकासातील अडथळे व उपाययोजना या विषयावर चंद्रबोधी सरांनी मार्गदर्शन केले.त्यावेळी या केंद्रातील बहुतांश शिक्षक बंधू भगिनींनी सहभाग घेतला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. आकांक्षा निनगुरकर मॅडम यांनी केले तर आभार मुख्याध्यापक विनोद भादिकर सर यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक शिक्षक यांनी अथक परिश्रम घेतले.
