
ढाणकी प्रतिनिधी – प्रवीण जोशी.
ढाणकी येथे दरवर्षीप्रमाणे यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ढाणकी येथे पुरातन व ऐतिहासिक असे श्री दत्तप्रभू यांचे भव्य मंदिर असून डिसेंबर महिन्यात भव्य अशी यात्रा भरत असते त्यात अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते त्यातील आज पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी भव्य कुस्त्यांची दंगल पार पडली या कुस्त्यांच्या दंगलीस अनेक ठिकाणावरून नामवंत अशा पहिलवानांनी हजेरी लावली होती. त्यात प्रथम क्रमांकाची कुस्ती ही विदर्भ केसरी असलेले हिंगोली येथील दिगंबर भूतनर पहिलवान यांनी मान मिळविला आहे यावेळी भव्य कुस्त्यांची दंगल बघण्यास ढाणकी व परिसरातील असंख्य प्रेक्षक हजर होते.
