ड्रिबलिंग बॉल खेळाचा थाटात लोकार्पण सोहळा

सहसंपादक : रामभाऊ भोयर

एक खेळ आणि दोन क्रीडांगणे असणारा जगातील एकमेव खेळ ड्रिबलिंग बॉल या नवीन खेळाचा लोकार्पण सोहळा रविवार ३ मार्च रोजी नेहरु स्टेडियम येथे आमदार अशोक उईके आणि मान्यवरांच्या उपस्थितीत फटाक्यांच्या आतीषबाजीत डिजिटल स्क्रीनवर बटन दाबून अत्याधुनिक पद्धतीने करण्यात आले.
राळेगाव तालुक्यातील शारीरिक शिक्षक विकास शेळके यांनी हा खेळ व त्याची नियमावली तयार केली आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष राळेगाव  विधानसभा मतदारसंघाचे आमदार अशोक उईके ,प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष तारीख लोखंडवाला, सामाजिक कार्यकर्ते भाई अमन, स्लिंगशॉट स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र चे अध्यक्ष बीपीन चौधरी ,जिल्हा शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ अमोल देशमुख, उद्योजक देविदास गोपलानी, जागतिक ड्रिबलिंग बॉल स्पोर्ट्स फेडरेशनचे अध्यक्ष अरविंद गाबडा, उपाध्यक्ष नंदकिशोर खैरनार, माजी नगरसेवक नितिन बांगर, ड्रिबलिंग बॉल स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ संतोष कोकुलवार,. ड्रिबलिंग बॉल स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे अध्यक्ष गौरव सूचक, अजय शेळके आदि उपस्थित होते.
छत्रपति शिवाजी महाराज यांच्या मूर्ति पूजनाने कार्यक्रमची सुरुवात करण्यात आली. यावेळी वर्ल्ड ड्रिबलिंग बॉल स्पोर्ट्स फेडरेशन, एशियन ड्रिबलिंग बॉल स्पोर्ट्स फेडरेशन,ड्रिबलिंग बॉल स्पोर्ट्स असोसिएशन  इंडिया, ड्रिबलिंग बॉल स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या चारही संघटनेच्या आकर्षक लोगोचे प्रकाशन करण्यात आले. मान्यवरांच्या  हस्ते रिमोट द्वारे
ड्रिबलिंग बॉल खेळाची नियमावली आणि वेबसाईटचे लॉन्चिंग देखील करण्यात आले.यावेळी दिल्ली, राजस्थान, आंध्र प्रदेश कर्नाटक, तामिळनाडू, केरला, राजस्थान, एन सी आर,पांडिचेरी, चंदीगड आधी राज्यातून आलेल्या राज्य सचिव आणि राज्यातून आलेल्या जिल्हा सचिवांचा  सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
मान्यवरांच्या उपस्थितीत मार्कंडेय पब्लिक स्कूल राळेगाव येथील विद्यार्थ्यांनी ड्रीबलिंग बॉल या खेळाचे प्रात्यक्षिक सादर केले.
आपले मनोगत व्यक्त करताना बीपीन चौधरी यांनी जिल्ह्यातील विकास शेळके या शारीरिक शिक्षकाने नवीन खेळ शोधल्याचे कौतुक करून एकच खेळ दोन ग्राउंडवर एकाच वेळी कसा खेळल्या जाईल याची उत्सुकता असल्याचे  सांगितले.
नंदकिशोर खैरनार यांनी पुढील दोन वर्षात ड्रिबलिंग बॉल हा खेळ भारतातील प्रत्येक राज्यात पोहोचवून त्याचा प्रचार प्रसार करण्यात असल्याचे आश्वासन दिले. तर आमदार अशोक उईके यांनी राळेगासारख्या ग्रामीण व आदिवासी बहुल भागातील शाळेच्या शारीरिक शिक्षकाने संशोधन करून नाविन्यपूर्ण खेळ काढने आणि त्याची आचारसंहिता  बनवणे आव्हानात्मक असल्याचे सांगून विकास शेळके याचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ड्रिबलिंग बॉल खेळाचे जनक विकास शेळके यांनी प्रास्ताविक करताना ड्रिबलिंग बॉल या खेळाची कल्पना कशी आली व ते नियमबद्ध कसे केले आणि प्रचार प्रसार करीत देशातील १६ राज्य तसेच जागतिक स्तरावर १० राष्ट्रात हा खेळ कसा नेला याचे अनुभव कथन केले.
संचलन प्रा.अनंत पांडे आणि प्रा. निलेश भगत यांनी केले.
तर आभार अविनाश जोशी यांनी मानले.
या कार्यक्रमाला  डॉ उल्हास नंदुरकर, साहेबराव राठोड,डॉ.शितल बल्लेवार, किरण फुलझेले, संजय कोल्हे,डॉ संतोषी साउळकर,गुड्डु मीर,गौरव निम्बोळकर, शहाडे ब्रदर्स, अविनाश भनक,संजय सातारकर,कैलास शिंदे,सागर रेकवार,निखिलेश बुटले.आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गौरव सूचक,अमोल बोदडे, किशोर चौधरी, शाहिद सैय्यद,गिरिराज गुप्ता,प्रकाश उदासी, राहुल ढोणे,प्रशांत उजवने कुलदीप वाघमारे,सतीश काकडे आरती ठाकरे ,यश ठाकरे, रीया गोडाले,वैभव वैद्य ,रुचिता वानखडे ,आर्यन खिरकर, यश तुरनकर यांनी परिश्रम घेतले.