आज वणी येथे भव्य आदीवासी एकता महोत्सवाचे आयोजन
बिरसा ब्रिगेड वणीचा पुढाकार

9 ऑगस्ट जागतीक आदिवासी दिनाचे औचित्य साधून आज 20 ऑगस्ट 2023 ला वणी येथील बाजोरीया हॉल येथे बिरसा ब्रिगेड वणी तालुक्याच्या वतीने “आदीवासी एकता महोत्सवाचे आयोजन थाटामाटात करण्यात येणार आहे.आदिवासी एकता महोत्सवात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रम हा तिन सत्रात विभागला आहेत.
सदर कार्यक्रम हा नियोजीत वेळेनुसार होणार असल्याने नागरीकाची गैर सोय होणार नसल्याचे आयोजकांकडून बोलण्यात आले आहेत
.

प्रथम सत्रात


डाॅ. संचिता नगराळे याच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रमेशभाऊ कुळमेथे भुषवणार आहे.
विषेश अतिथी म्हणून विश्वास नांदेकर, इजहार शेख, विजय नगराळे,
निळकंठजी जुमनाके देविदास चांदेकर डाॅ. गजानन मेश्राम आनंदरावजी आत्राम सुभाषजी आत्राम दिलीप भोयर अजय धोबे मंगलजी तेलंग नइम अजित संबा वाकुजी वाघमारे राजुभाऊ तुराणकर प्रविण खानझोडे राहुल आत्राम कैलास आत्राम हरिभाऊ रामपुरे
व इतर राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवराच्या उपस्थीतीत उद्घाटनीय सोहळा पार पडणार आहे.

आदिवासी एकता महोत्सवात
प्रमुख मार्गदर्शक म्हणुन ऍड. एल. के मडावी हे यु.सि.सि (समान कायदा आदिवासी समाजाला पोषक की नुकसानदेह) यावर ते भाष्य करणार आहेत.दुसर्‍या मार्गदर्शिका डाॅ. अभिलाषा बेहेरे- गावतुरे ह्या आदिवासी समाजातील महीलाचा सामाजिक ,आर्थिक, शैक्षणिक, व राजकीय, स्तर वाढीबाबाबत त्या बोलणार आहे. आदिवासी समाजातील महीलां व युवतींना शशक्त करण्यास त्यांचे अमूल्य मार्गदर्शन आयोजित कार्यक्रमात लाभणार आहेत.

दुसऱ्या सत्रात आदिवासी समाजातील विध्यार्थ्याचा गुणगौरव होणार आहेत.
यात दहावी, बारावी, पदवीधर व तसेच शिष्यवृत्ती गुणवंतांचा
गुणगौरव उपस्थीत मान्यवरांकडून
सत्कार होणार आहेत.तसेच समाजहितासाठी अहोरात्र झटणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा वणी तालुका बिरसा ब्रिगेडच्या वतीने समाज गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
यात सत्कारमूर्ती म्हणून प्रा. वसंत कनाके, आदिवासी साहित्यीक यवतमाळ,
ब्राह्मणनंद मडावी कवी साहित्यिक मुल चंद्रपूर तसेच
विनोदकुमार आदे कवी, साहित्यिक तथा संपादक वणी यांचा प्रामुख्याने समावेश राहणार आहे.

अंतिम सत्रात
आदिवासी समाजातील सांस्कृतिक वारसा
टीकून राहण्यासाठी आदिवासी नृत्य स्पर्धेच आयोजन करण्यात आले आहे. यात गोडी नृत्य, व ढेमसा नृत्य प्रकार राहणार आहेत.ह्या आदीवासी एकता महोत्सवात बिरसा ब्रिगेड चे महाराष्ट्र राज्य व विदर्भातील प्रमुख पदाधीकारी उपस्थीत राहणार आहे. वणी तालुक्यातील आदिवासी समाज बांधवांनी आदिवासी एकता महोत्सवात मोठ्या संख्येने उपस्थित राहून आयोजित कार्यक्रमाची शोभा वाढवावी
असे आवाहन बिरसा ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष सुधाकर चांदेकर यांनी केले आहे
.