वरूड जहाँगीर येथे भव्य भजन खंजेरी स्पर्धा, भरपूर बक्षिसाची बरसात

्राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील वरूड जहाँगीर येथे गुरूदेव मानवसेवा मंडळ वरूड ज. यांच्या वतीने विदर्भ स्तरीय भव्य खंजेरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून पुरूष गटांसाठी पहिले बक्षीस 15001 रूपये वसंत पुरके,माजी शिक्षणमंत्री यांचे कडून, दुसरे बक्षीस 12001 रूपये रविंद्र देशमुख व प्रकाश पोपट यांचे कडून,तिसरे बक्षीस 10001 रूपये गुरूदेव सेवा मंडळाकडून,चौथे बक्षीस 8001 रूपये दिपक देशमुख, पाचवे बक्षीस 6001 रूपये राजेंद्र तेलंगे,सहावे बक्षीस अनिल केवटे,सातवे बक्षीस 4001 रविंद्र नौकरकार,आठवे बक्षीस 2001 रूपये कृष्णराव राहूळकर,नववे बक्षीस 1001 विनय मुनोत यांचेकडून देण्यात येणार असून महिला गटांसाठी पहिले बक्षीस 9001रूपये अरविंद वाढोणकर,दुसरे बक्षीस 7001रूपये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वरूड,तिसरे बक्षीस 6001रेखाताई उईके,चौथे बक्षीस 5001रूपये अरविंद फुटाणे,पाचवे बक्षीस 4001रूपये अशोकराव केवटे,सहावे बक्षीस 3001रूपये सुधीर डोमकावळे,सातवे बक्षीस 2001रूपये बाबाराव भोरे,आठवे बक्षीस 1501 रूपये गुरूदेव सेवा महिला भजन मंडळ वरूड जहाँ,नववे बक्षीस 1001रूपये प्रविण आडे यांचे कडून देण्यात येणार असून ह्या स्पर्धा दिनांक 25,26,27, फेब्रुवारीला घेण्यात येणार असून या कार्यक्रमाचे उद्घाटक वसंत पुरके माजी शिक्षणमंत्री, अध्यक्ष प्रफुल्ल मानकर, अध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमेटी यवतमाळ जिल्हा,तर प्रमुख पाहुणे दिपक देशमुख, अरविंद वाढोणकर, मिलिंद इंगोले, जानराव गिरी, राजेंद्र तेलंगे,वर्षाताई तेलंगे, नंदकुमार गांधी, अरविंद फुटाणे, प्रविण कोकाटे, रविंद्र देशमुख, अशोकराव केवटे यांच्या उपस्थितीत पार असून दिनांक 25/2/2023 ला सायंकाळी ह.भ.प.प्रमोद महाराज देशमुख यांच्या जाहीर किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे गुरूदेव सेवा मंडळाचे उत्तम भोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.