
बल्लाळशाह नाट्यगृह बल्लारपूर येथे रविवार 13 नोव्हेंबर रोजी गोंडराजे फॅशन शो, रानी इवेंट्सच्या मंदा कोपुलवार आणि धम्मदिनी तोहगावकर यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता.
या फॅशन शो कार्यक्रमाला प्रमुखपाहुण्या म्हणून डॉ. रजनी हजारे,अनुश्री दहेगावकर, मधु कपूर, प्रकाश तोहगावकर, समृद्धी तोहगावकर, ज्ञानेंद्र आर्य प्रामुख्याने उपस्थित होते. शो ची सुरवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आली. यात एकूण32 स्पर्धकांनी सहभाग घेतला. या सुपर मॉडेल फॅशन शो मध्ये ग्रुप 3 ते 12 वर्षा मध्ये विजेता ध्वनी नाईक, ओवी दुर्योधन, शमन पाटील ठरले. मिस बल्लारपूर म्हणून नूतन सिडाम विजेता बनली. मिसेस बल्लारपूर सोनाली गोहने तर मिस्टर बल्लारपूर सुरजीत सिंग विजेता बनले. हे सर्व बल्लारपूर सुपर मॉडेल ठरले त्यांना मान्यवरांच्या हस्ते क्राउन, पारितोषिक देण्यात आले. शुभम गोविंदवार आणि विरश्री खोब्रागडे यानी स्पर्धकांचे परीक्षण केले. संचालन नौशाद सिद्दीकी यानी केले. यावेळी अफसाना सय्यद,माया भगत, गायत्री रामटेके, वनिता रायपुरे, श्रृंखला चौधरी, डॉ अंकिता वाघमारे, डॉ प्रणीता ओसवाल, अरुणा राजुरकर, विकास मोरेवार, जान्हवी चौधरी, सक्षम तोहगावकर आदिंनी मोलाचे सहकार्य केले.
