सोनामाता हायस्कूल ला माजी विद्यार्थ्यांकडून क्रीडा साहित्य भेट

सहसंपादक : रामभाऊ भोयर

सोनामाता हायस्कूल चहांद ला शाळेतील माजी विद्यार्थी व सध्या याच शाळेत कार्यरत असणारे कु. शितल मोहनराव गावंडे मॅडम व प्रथमेश संजयराव राऊत यांच्याकडून क्रीडा साहित्य भेट देण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मा अनिल धोबे सर, चीव्हाने सर, कांबळे सर, शिवणकर सर, दांडेकर सर, गोवारदिपे मॅडम, सावंत सर, देवानंद सोनोने, राजेंद्र झोटिंग हे सर्व उपस्थित होते.
माझी शाळा सुंदर शाळा या अभियाना अंतर्गत लोक सहभाग तसेच शाळेतील माजी विद्यार्थी यांच्य यांच्या मदतीने शाळेचा सर्वांगीण विकास साध्य करणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून सोनामाता हायस्कूल चहांद येथे कार्यरत असणारे कु. शितल मोहनराव गावंडे (सहाय्यक शिक्षिका) व प्रथमेश संजयराव राऊत (परिचर) यांनी शाळेला उपयोगी असे क्रीडा साहित्य भेट स्वरूपात दिले. या साहित्याचा उपयोग विद्यार्थ्यांना मैदानी खेळ खेळताना होईल. विद्यार्थ्यांमध्ये खेळाबद्दल विशेष आवड निर्माण व्हावी या उद्देशाने हे साहित्य दिल्याचे प्रतिपादन गावंडे मॅडम यांनी केले. अशाच प्रकारे गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि माझी विद्यार्थी यांनी शाळेच्या विकासास हातभार लावावा अशी अपेक्षा प्रथमेश राऊत यांनी व्यक्त केली.क्रीडा साहित्य मिळाल्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. माजी विद्यार्थ्यांनी शाळेला केलेल्या या मदतीचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.