वीज पडून बैलांचा मृत्यू,ऐन हंगामात शेतकऱ्यावर अस्मानी संकट

झरी तालुक्यातील वीज पडून दोन बैल ठार बाबाराव ठेंगडे शेतकरी राहणार खडकी गणेशपुर विज पडून गोरा दगावल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील उमरी येथे आज दि ३ सप्टेंबरला सकाळी ९ वाजता चे सुमारास उघडकीस आली आहे.

आज रविवारी सकाळी अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले आणि पाहता पाहता विजेच्या कडकडीत पावसाने हजेरी लावली दरम्यान उमरी येथिल सतिष बापुजी तिखट यांच्या शेतातील गोठ्यावर विज कोसळली यामध्ये गोठ्यात बांधून असलेला तिन वर्षे वयाचा गोरा दगावला. सदर गोऱ्याची किंमत अंदाजे पस्तिस हजार रुपये असल्याची माहिती मिळाली आहे. सदर घटनेचा तलाठी बि.के.सिडाम यांनी पंचनामा करून अहवाल तहसीलदार वणी यांना पाठविलेला आहे