
सहसंपादक : रामभाऊ भोयर
प्रा.भूषण हसमुख भट्टी यांना नुकत्याच संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती येथे पार पडलेल्या दिक्षांत समारंभात आचार्य पदवी (पीएच.डी.) प्रदान करण्यात आली. पदार्थविज्ञान (फिजिक्स) विषयातील “FABRICATION OF COMPOSITES OF SnO2, TiO2 and ZnO IN MULTILAYER WITH PPy FOR CO2 GAS SENSORS” या टॉपिकवर त्यांनी प्रबंध सादर केला होता. त्यांना विद्याभारती महाविद्यालय, अमरावती येथील प्रा. डॉ. किशोर ब. राऊळकर सर यांचे मौलाचे मार्गदर्शन लाभले.
नुकत्याच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती येथे पार पडलेल्या ४१ व्या दीक्षांत समारंभात अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख सर यांच्या हस्ते त्यांना आचार्य पदवी प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल माननीय सी.पी. राधाकृष्णन उपस्थित होते. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक प्रा. डॉ. के. बी. राऊळकर सर, विभाग प्रमुख प्रा. डॉ. जी. टी. लामधाडे सर, विद्याभारती महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. पि. एस. येनकर, त्यांचे आई, वडील, पत्नी, बहीण, सासु, सासरे व मित्र परिवार, तसेच इंदिरा गांधी कला महाविद्यालय, राळेगाव चे संस्था अध्यक्ष प्रा. वसंतरावजी पुरके, प्राचार्य डॉ. एस. व्हि. आगरकर, संपूर्ण शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना दिला.
