
लोकहित महाराष्ट्र उमरखेड
तालुका प्रतिनिधी: संदीप बी जाधव
आज सहकार भवन यवतमाळ येथे आयोजित केलेले व्हॉइस मीडिया पत्रकार पॉलिसी वितरण सोहळा प्रमुख पाहुण्याच्या हस्ते सर्व पत्रकारांना पोस्टल अकाउंट मध्ये देण्यात आले. ज्याचे कोणाचे पोस्टल अकाउंट खुल्ले नाही त्यांना भवन मध्ये अकाउंट ओपन करून दिले व प्रमुख अतिथी माननीय श्री संदीप काळे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष व्हॉइस ऑफ मीडिया च्या वतीने सर्व पत्रकारांना स्वतःच्या पोस्टल खात्यामध्ये चारशे रुपये प्रति वर्ष फ्री ऑफ अकाउंट खोलून दिले. दहा लाखापर्यंत असलेले विमा योजना पत्रकारांच्या हितासाठी, एक्सीडेंट असो, अथवा मरण पावल्यावर त्यांच्या कुटुंबाला विमा पॉलिसी त्यांच्या मुलांच्या भवितव्यासाठी कामाला येईल म्हणून वितरण करण्यात आले. त्यामध्ये सर्व यवतमाळ जिल्ह्याभराचे पत्रकार शामिल होते, व प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी यवतमाळ माननीय श्री अमोल येडगे, पोलीस अधीक्षक यवतमाळ डॉक्टर पवन बनसोड, तारीख शाहीर लोखंडवाला समाजसेवक व जिल्हाध्यक्ष संजय राठोड आयोजक व्हॉइस मीडिया पत्रकार संघटना यवतमाळच्या वतीने पार पडले.
