कर्तव्यदक्ष ठाणेदार विजय महल्ले यांचा येवती येथे महिलांकडून सत्कार

राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर

   

राळेगाव तालुक्यातील वडकी पोलीस स्टेशन येथील नव्याने रुजू झालेले कर्तव्यदक्ष ठाणेदार विजय महल्ले यांचा येवती येते महिलांकडून सत्कार करण्यात आला सविस्तर वृत्त असे वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या येवती येथे ग्रामपंचायत व गावातील महिला यांनी दारू बंदी करण्याचा एक मताने निर्णय घेतला आहे या निर्णयाचे स्वागत करत ग्रामपंचायत व महिला यांनी वडकी पोलीस स्टेशनला नव्याने रुजू झालेले ठाणेदार यांना निवेदन देण्यात आले होते या निवेदनाची दखल घेत येवती येथे काही दारू विक्रेत्यावर कार्यवाही करण्यात आली आहे.व त्यानंतर गावामध्ये महिलांचा एक गट स्थापन करून ठाणेदार विजय महाले यांच्या उपस्थितीत महिलांनी दारूबंदी ची एक समिती स्थापन करून गावामध्ये बोर्ड लावण्यात आला आहे सदर महिलांनी वडकी पोलीस स्टेशनला निवेदन देताच ठाणेदार विजय महाले यांनी दारू विक्रेत्यांवर कारवाई केल्याबद्दल त्यांचा येवती येथील ग्रामपंचायत पदाधिकारी व गावातील महिला यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.