
प्रतिनिधी::प्रवीण जोशी
दिनांक १६ एप्रिल रोजी शहरातील स्थानिक आखर इंदिरा गांधी चौक म्हणून प्रसिद्ध असलेल्या खुल्या प्रांगणात सायंकाळी हा प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी मोठ्या प्रमाणात प्रवचन श्रवण करण्यासाठी भक्तमंडळी जमली होती भक्तांना बसण्यासाठी योग्य अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात तसेच कार्यक्रम रात्रीच्या वेळी असला तरी आयोजकांनी प्रकाशाची व्यवस्था करून अडथळा दूर केला होता.
प्रथम यावेळी गणरायाला स्तवनातून वंदन केले पंधरावा अध्यायाला अनुसरून प्रवचनाला सुरुवात केली यावेळी भगवती म्हणाल्या की गुरुराया गेल्यानंतर शहरातला हा पहिलाच प्रवचनाचा कार्यक्रम असून त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गानुसारच आम्ही चालत आहे. महाराज नाहीत असे म्हणणे योग्य ठरणार नाही सगुण शक्ती रुपाने ते आपल्या बरोबरच आहेत. व त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गक्रमानुसारच आम्ही चालत असून वारकऱ्यांचा कुळधर्म हा पांडुरंग आहे त्याच्या आधारे संपूर्ण जीवन चालते यामुळे आपसूकच भगवंताचे भक्त भक्तिमय पुष्पात गुंफल्या जातात अवयवांची कार्य पार पडले म्हणजे आपण सर्वच काही शिकलो असे होऊ शकत नाही का? तर नाही ते आपल्या योग्य कृती मधून सुद्धा उतरावे लागते गीता ही संस्कृत मध्ये असताना माऊलीने ती सोपी केली व सर्वसामान्यांना अमृत दालन खुले केले संस्कृत मध्ये एका शब्दाचे हजारो अर्थ निघतात ते ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी अन्नग्रहण करायचे असल्यास त्यावर योग्य ती क्रिया करावी लागते व पोषक असे पदार्थ टाकल्यानंतरच ते परिपूर्ण होते अशीच काहीसी अवस्था ज्ञानेश्वरी बाबत असते अशा प्रकारचे विविध उदाहरणे देऊन ज्ञानेश्वरीची उपयुक्तता भगवती ताईंनी आपल्या प्रवचनातून सांगितली.
