
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
वर्धा जिल्ह्यातील सिंदी रेल्वे येथे १४० वर्षाची परंपरा कायम राखत तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात येते. यावर्षी येथील पोळ्यात वडकीच्या नंदीबैलाने सहभागी होत प्रात्साहनपर बक्षीस प्राप्त केले.
यावर्षी सिंदी रेल्वे येथील आयोजित नंदी पोळ्यातील स्पर्धेत वडकी येथील माऊली उमक मित्र मंडळातर्फे नंदी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित प्रतिकृती देखाव्यासह पहिल्यांदा सहभाग नोंदवला. सदर कार्यक्रमामध्ये जवळपास विदर्भातील १२० नंदीबैलांचा सहभाग होता. त्यात निवड समितीकडून चार विभागांमध्ये पारितोषिकांचे विभाजन करण्यात आले. त्यात प्रोत्साहनपर पारितोषिक विभागामध्ये वडकी येथील माऊली उमक मित्र मंडळ यांच्या नंदीने प्रथम क्रमांक पटकाविला. यावेळी माऊली उमक मित्र मंडळाचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष आ. समीर कुणावर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह
देऊन करण्यात आला. यावेळी मंडळाचे सदस्य माउली उमक, नागेश्वर उमक, विजय देठे, रितेश डुडूलकर, उमेश कडू , गजू गराट, उमेश राऊत, रवींद्र खंडाळकर, ऋषभ मुंगसे, सूरज येरेकार, विकेश अंड्रस्कर, धीरज कडू, योगेश खंडाळकर, यंशवत वैद्य, आकाश गोबाडे, समीर येरेकार, विवेक पिसाळकर, निखिल बावणे, अभिनय डवरे, ओम खंडाळकर, खुशाल पिसाळकर व युगांत वाटेकर यांनी मोलाचे योगदान दिले.
