
सहसंपादक : रामभाऊ भोयर
धी शिया ईमामी इस्माईली समाजाच्या स्पोर्ट्स बोर्ड च्या वतीने दुबई येथे ज्युबेली गेम स्पर्धा दिनांक 18 ते 27 जुलै 2025 पर्यंत आयोजित केली आहे. यामध्ये जवळपास 21 देशातील खेळाडू सहभागी होणार आहे, यामध्ये क्रिकेट, व्हॅली्बॉल, टेनिस, सह अनेक खेळांचा समावेश असून सोबतच विविध ऍक्टिव्हिटीज सुद्धा होणार आहे.
या स्पर्धेत राळेगाव येथील आदर्श मंडळाचे फिरोज लाखाणी यांचे चिरंजीव अमर लाखाणी यांची युगांडा या देशाच्या संघाकडून निवड झाली आहे.
या निवडी बद्दल आदर्श क्रिकेट क्लब च्या सर्व सदस्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले त्यांच्यावर राळेगाव तालुक्यातून सर्वच स्थरातून अभिनंदनाचा वर्षाव होतं असून अमर चे कौतुक होतं आहे.
