राळेगावचे ग्रामीण रुग्णालय समस्याच्या विळख्यात,प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी उपस्थित राहत नाही?

राळेगाव तालुक्यात धानोरा, वरध, वाढोना बाजार, दहेगाव या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या प्राथमिक आरोग्य केन्द्रात प्रथमोपचार करून येथील डाॅक्टर राळेगाव ग्रामीण रुग्णालयात पेशंटला रेफर केले जाते हि नित्याची बाब आहे . या तालुक्यात सर्वात जास्त आदिवासी बांधवाची संख्या जास्त आहे मतदारसंघ सुद्धा राखीव आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ग्रामीण रुग्णालय राळेगाव हे समस्याच्या विळख्यात पडले आहे पिन्याचे पाणी उन्हाळ्यात उपलब्ध राहत नाही वेळेवर डाॅक्टर सुद्धा येत नाही विशेष. ग्रामीण रुग्णालय राळेगाव येथे अधिकारी तसेच कर्मचारी यांच्यासाठी राहण्यासाठी काॅर्टरची व्यवस्था असून सुद्धा हे अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. थेट यवतमाळ वरुन अपडाऊन मध्ये आपला अमुल्य वेळ वाया घालवत असतांनाचे चित्र दिसत आहे. काही कर्मचारी यांच्या सकाळची आठ वाजताची ड्युटी असते मात्र हे कर्मचारी साडेदहा किंवा अकरा वाजता ड्युटी वर हजर होतात. यांच्यावर जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी मुख्यालयी राहन्याचे सक्त आदेश देण्यात यावे. सध्या ग्रामीण रुग्णालय राळेगाव येथे दोन पार्ट्या तयार झाल्या आहे हा नविनच वाद काही पेशंट कडून ऐकाला मिळत आहे. ज्यांच जास्त वजन पडेल तो कर्मचारी त्या पेशंट जवळ जाताच नाही या वादात पेशंट ला वेळेवर उपचार नाही मिळाला तर पेशंट दगावण्याची दाट शक्यता आहे. या सर्व प्रकरणामध्ये वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.