
सहसंपादक : रामभाऊ भोयर
दिनांक 02 ऑगस्ट 2024 ला समग्र शिक्षा समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत दिव्यांग विद्यार्थी लाभार्थ्यांना साहित्य साधने वाटपाचे शिबिर आयोजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमासाठी . गटविकास अधिकारी, केशव पवार साहेब,
गटशिक्षणाधिकारी, राजू काकडे साहेब, तसेच .विस्तार अधिकारी ( शिक्षण) . निलेश दाभाडे साहेब नवनाथ लहाने साहेब, यांचे शुभहस्ते साहित्यांचे लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी सदर दिव्यांग विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन गट संसाधन केंद्र समावेशीत शिक्षण विभाग यांच्या वतीने करण्यात आले . सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठीश.सचिन वेरुळकर, कुमारी माधुरी धामंदे, राहुल पोटरकर, दीपेश शेंडे, विनोद
मेंढे, दीपक सोळुंके, चंद्रकांत मडावी, (विशेष शिक्षक ),राहुल कुंभारे, प्रशांत चांदोरे, सुरेखा अड्डे( विषय साधन व्यक्ती) इत्यादींचे सहकार्य लाभले. उपस्थित पालकांनी समाधान व्यक्त केले. तसेच उपस्थित मान्यवरांनी सर्वांना योग्य मार्गदर्शन केले.
