राळेगाव मतदार संघातील उमेदवार पूरके सर काँग्रेस पक्षाच्या प्रचारार्थ आज राळेगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष ऍड. प्रफुल्ल मानकर यांनी आगामी निवडणुकीत काँग्रेसची ताकद दाखवण्याचे आवाहन केले. त्यांनी स्पष्ट केले की, “ही माझ्या अस्तित्वाची निवडणूक असून मी स्वतः मैदानात आहे. पक्षाच्या प्रत्येक उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मी पूर्णतः झोकून देणार आहे.”
ते पुढे म्हणाले, “मी आजपर्यंत कधीच वैयक्तिक प्रचारासाठी घराघरात फिरलो नाही, परंतु या निवडणुकीत पुरके सरांचा प्रचार करण्यासाठी घरोघरी जात आहे. पुरके सर हे माझ्या पाठोपाठ काँग्रेसचे मजबूत नेतृत्व आहे, आणि यावेळी आम्ही एकत्रितपणे पक्षाला यश मिळवून देणार आहोत.”
काँग्रेस पक्षासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असून जिल्ह्यातील प्रत्येक जागा जिंकण्याची जबाबदारी स्वीकारल्याचेही त्यांनी नमूद केले.त्यांच्या या आवाहनामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी निवडणुकीत पक्षाच्या यशासाठी त्यांनी एकत्रित काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.