हेल्प फाऊंडेशनचे संस्थापक भाविक भगत यांचे आंबोडा येथील नागरिकांना घेऊन तहसील कार्यालय महागांव येथे साखळी उपोषण


उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड

महागाव तालुक्यातील.अंबोडा ता. महागाव जि.यवतमाळ या गावातील लोकांना मागील एक महिन्यापासून विद्युत पुरवठाचा भरपूर त्रास होत होता. गावातील विद्युत पुरवठा वारंवार गायबच राहत होता अशा परिस्थितीमध्ये. आंबोडा गावातील समस्त नागरिकानी तहसील कार्यालय महागाव येथे साखळी उपोषणाला बसले होते.दोन दिवसा पासून साखळी उपोषण चालू होते आज त्या अनुषंगाने भाविक भाऊ भगत फाउंडेशन युवा ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री भाविक भाऊ भगत यांनी महागाव येथे साखळी उपोषणाला भेट देऊन भाविक भाऊ भगत हेल्प फाउंडेशन युवा ब्रिगेड तर्फे जाहीर पाठिंबा. वेळप्रसंगी कुठल्याही प्रकारचे मदतीचे सहकार्याचे आश्वासन दिले व हेल्प फाउंडेशन ची सर्व टीम या बाबीचा वरिष्ठ स्तरावर पाठपुरावाकडे तसेच अंबोडा वासियांच्या पाठीशी तटस्थपणे उभे राहील असे आश्वासन दिले.
या वेळी उपस्थितीत भाविक भाऊ भगत हेल्प फाऊंडेशन युवा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष भाविक भाऊ भगत जिल्हाध्यक्ष अनुप शेखावत जिल्हा उपाध्यक्ष विष्णू चौधरी जिल्हा संयोजक प्रमोद राठोड तालुका अध्यक्ष शुभम वानखेडे तालुका अध्यक्ष राजकुमार शिरगरे तालुका उपाध्यक्ष शुभम राठोड अपंग संघटना तालुका अध्यक्ष प्रेमानंद पांचाळ तालुका सचिव वैभव पाईकराव तालुका सरचिटणीस अमोल राठोड तालुका संयोजक सौरभ तगडपल्लेवार तालुका समन्वयक सत्यजित भोयर विनोद भोयर तालुका विद्यार्थी संघटना तालुका अध्यक्ष गणेश भागवतकर उपाध्यक्ष पियुष हरणे तालुका संयोजक शिवाजी पाटील काळे गोलू मस्के अमर डव प्रविण देवारे गजानन काळे बालाजी काळे, हे सर्व मान्यवर उपस्थित होते.