
राळेगांव तालुक्यातील आपटी (रामपूर ) येथील अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू असून तरुण पिढी, विद्यार्थी हे विविध व्यसनांना बळी पडत आहेत यामुळे अनेकांच्या संसाराची राख रांगोळी होत आहे. गावात अवैध दारू विक्री होत असल्याने अल्पवयीन मुले, विद्यार्थी व युवा वर्ग व्यसनाधीन होत असल्यामुळे आपटी (रामपुर )गावातील संतप्त महिलांनी राळेगाव पोलीस स्टेशनला जाऊन ठाणेदार मैत्रे व राणे साहेब यांना निवेदन देण्यात आले. तसेच गावात सुरू असलेले अवैध दारू विक्री, यावर कायम स्वरूपी बंदी घालावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी महिलांनी दिला आहे यावेळी,
उपसरपंच शशिकांत पिपंरे, ग्रा. प. सदस्य ओमप्रकाश मेश्राम , शशिकांत (बाळू)भाऊ धुमाळ (सामाजिक कार्यकर्ता )दिपक कोडापे, मारोती धुर्वे,मंदा मेश्राम, सविता येरकाडे,मालताबाई मेश्राम,अन्नपूर्णा नेहारे, शारदा परचाके, वंदना किन्नाके,गीता टोळे, सविता येरकाडे, कल्पना मरस्कोल्हे,सविता धुर्वे, ललिता कोडापे, चंद्रकला आत्राम, लक्ष्मी धुर्वे, सोनू मरसकोल्हे, माधुरी येरकाडे, शांताबाई उइके, सविता धुर्वे, इत्यादी महिला उपस्थित होत्या ..