
आगामी पोळा, ईद -ए-मिलाद , गणपती उत्सव लक्षात घेता. बिटरगांव पोलीस स्टेशनच्या वतीने शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी बिटरगांव ( बु ) पोलीस स्टेशनच्या ठाणेदार सुजाता बनसोड यांची उपस्थिती होती. सण उत्सव व इतर वेळी सुद्धां गावामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी शांतता कमिटीच्या सर्व सदस्यांची भूमिका महत्वाची आहे. व तसेच सर्व मंडळांचे विसर्जन वेळेवर व्हावे आणि सर्व प्रकारच्या परवानगी काढावी कायद्याच्या चौकटीत राहून उत्सव साजरा करूनच प्राधान्य करावे असे मत व्यक्त केले.
प्रमुख अतिथी बिटरगांव चे पोलीस पाटील नामदेव देवकते तंटामुक्ती अध्यक्ष मोहन कोंडेवाड उपसरपंच प्रकाश पेंदे अल्पसंख्या अध्यक्ष शेख मुसा शेख गुलाब महावितरण अधिकारी सुरोशे यांनी मत व्यक्त केले.माजी सैनिक उत्तमराव शिरगरे शेख मुसा से गुलाब सर्पमित्र प्रकाश खूपसरे यांनी काही सूचना मांडल्या यांची दखल घेण्याचे आश्वासन ठाणेदारांनी दिले. गणेश मंडळाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष व सदस्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी नेहमी प्रमाणे जुन्या समस्या नव्याने मांडल्या आणि ठाणेदार सुजाता बनसोड नेहमी प्रमाणे उपाय योजना काढायचे आश्वासन दिले. गणेश उत्सव काळात ठाणेदार सुजाता बनसोडे यांनी विद्युत अधिकाऱ्यांनी लाईटची सुविधा करून द्यावी व उत्सव मार्गावरील विद्युत ताराचा अडथळा असल्यास बाजूला करून द्यावा असे मनोगत व्यक्त केले. अँड विनोद मामीडवार विजय विनकरे संदेश कांबळे उत्तम सोनुले मस्तान खां पटेल. चांद पटेल विलास आडागळे शेख इरफान बालाजी हाके सचिन साखरे व शांतता कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
