
प्रतिनिधी:शैलेश अंबुले,तिरोडा
तिरोडा – आज मौजा भजेपार ला राष्ट्रीय शास्वत शेती अभियान रब्बी हंगाम २० – २१ अंतर्गत हरभरा पिकाचे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन या प्रशिक्षणात मा. के.एन. मोहाडीकर तालुका कृषी अधिकारी ,चव्हाण साहेब कृषी विज्ञान केंद्र हिवरा किड रोग शास्त्रज्ञ ,पी.पी. खंडाईत मंडळ कृषी अधिकारी , रिनाईत साहेब कृषीसेवक .
या प्रशिक्षणात मा. मोहाडीकर यांनी मार्गदर्शन करत हरभरा पिकावर होणाऱ्या कीड व त्याचे व्यवस्थापन म्हणून हरभऱ्याच्या पिक थोडं मोठे
झाल्यावर त्यामध्ये पक्षीथांबे बांधावा (पक्षांना बसण्याकरिता )
पक्षी कीड खातात .हे उपाय सांगितलं .
चव्हाण साहेबांनी मार्गदर्शन करत सांगितलं की हरभरा पीक लागवट करताना बीजप्रक्रिया कशी करावी म्हणजे बियांना (सीड टिटमेंट) करून बुरशीनाशकांचा उपयोग करून थायरम मिसळुन त्याला वळवावा. हरभरा टोकण पद्धतीने लावावे व असे केल्याने त्यांचे हरभऱ्याचे पीक(रोप) निघण्याकरिता मदत होते. जमिनीत जर ५ % निमोडी अर्क फवारणी करून घाटेवाडी रोगावर निर्बंध लागतात. व उत्पन्न जास्त वाडण्याकरिता मदत होते.
जेव्हा शेतकऱ्यांनी प्रश्नः चालू केले व भात पिकावर लागणाऱ्या रोगाबद्दल माहिती घेतली. यात त्त्यांना लष्करीअळी ला कसे नियंत्रणात ठेवावे या करिता1 लिटर राकेल 20 किलो मातीत मिसळून ते पिकावर मरावं.त्या बरोबर तुळतुळा करिता मेंटरायझम (पावडर) २ किलो फवारणी करावी. या प्रकारे माहिती दिली.
प्रतिनिधी:- शैलेश अंबुले तिरोडा तालुका ७७६९९४२५२३
