
प्रतिनिधी: प्रवीण जोशी
ढाणकी.
ढाणकी येथून जवळच असलेल्या बिटरगाव (बू) येथे
संगीतमय रामायण कथेचे आयोजन दिनांक २० जानेवारी२०२३ पासून सुरू झाले असून यावेळी बोलताना भीमाशंकर स्वामी म्हणाले, श्रीराम कथाही मनुष्याच्या जीवनाला वेगळे वळण देऊ शकते आपणा सर्वांना ज्ञात आहे की रामायण रचनाकार हे वाल्मिकी ऋषी होते पण त्याआधी त्यांच्या जीवनात असंख्य वाईट आणि अत्यंत कठीण प्रसंग आले. पण प्रभू श्रीरामचंद्र यांचे स्मरण त्यांच्या मुखातून होऊ लागले त्यावेळी त्यांचे कल्याण व उद्धार झाला इतकी विराट शक्ती प्रभू रामचंद्राच्या नामस्मरणामध्ये आहे. बिटरगाव येथे अखंड संगीत रामायण चालू असून कथेच्या चौथ्या पर्वात रामायणाचार्य भीमाशंकर स्वामी म्हणाले मनुष्याला जेव्हा जीवनामध्ये दुःख व पीडा येते तेव्हाच तो प्रभु रामचंद्राच्या स्मरणाकडे वळतो जग जर दुःखात असेल तर ते प्रभू रामचंद्राला मुळीच बघवत नाही. समाजाचा आणि भक्ताचा उद्धार झाला पाहिजे हाच हेतू प्रभू रामचंद्राचा असतो.
प्रभू रामचंद्र यांच्या सानिध्यात गेल्यावर प्रपंचाच्या सुखाची मागणी न करता स्वतःच्या उद्धाराची मागणी करा प्रपंच हा मोह काही ठराविक काळच असतो. श्री रामायण कथा ही जीवनासाठी अमृततुल्य कलश असून विश्वातील सर्व साधने एका पारड्यात टाकली तरी श्री रामायण कथेची बरोबरी होऊ करू शकत नाही. साक्षात ब्रह्मदेवांनी सुद्धा रामायण कथेला आपले आराध्य मानले संपूर्ण व सकल विश्वाचा उद्धार करण्याची शक्ती रामायण कथेमध्ये असून फक्त नित्यनेमाने प्रमुरामचंद्राचे स्मरण व श्रवण करणे महत्त्वाचे आहे. प्रभू रामचंद्राचे नामस्मरण करणाऱ्या भक्ताचा अधिकार मोठा असतो भुकेल्याला अन्न तहानलेल्या पाणी जर आपण दिले तरच खरा परमार्थ करू शकतो. परंतु आजकालची मनुष्याची स्वार्थी भूमिका दैनंदिन जीवनातील अनावश्यक गरजा या परमार्थिक गोष्टी पासून दूर ठेवत आहे मनुष्याची परमार्थिक वृत्तीची वृद्धी होणे गरजेचे आहे. ती जर वाढीस लागली तरच उद्धार होऊ शकतो संसाररुपी जीवनात वावरत असताना उद्धार करायचा असेल तर श्रीराम कथेचे श्रवण करणे व श्रीराम जय राम जय जय राम असा मंत्र जपत राहणे यातच जीवनाचे सार्थक आहे. असे यावेळी रामायणाचार्य भीमाशंकर स्वामी म्हणाले.
