शिक्षण म्हणजे प्रगतीचे शस्त्र

राळेगांव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

मानवाचा जीवनातील सर्वात मोठा अभिशाप म्हणजे निरक्षरता कारण निरक्षरता मानवी जीवनाला नरक बनविते. निरक्षर असलेल्या लोकांना साक्षरतेची संधी मिळावी म्हणून युनेस्कोद्वारे १९६५ पासून दरवर्षी ८ सप्टेंबरला जागतिक पातळीवर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस साजरा केला जातो.संपूर्ण देशात अशिक्षा दुर करण्याचा संकल्प या दिवशी केला जातो . या दिवसामुळे  जगभरात समाजासाठी साक्षरतेचे महत्व किती आहे हे अधोरेखित होते. साक्षरता म्हणजे फक्त वाचन -लेखन करता येणे किंवा पदवी संपादन करणे नव्हे तर लोकांचे हक्क,अधिकार कर्तव्यांची जाणीव कौशल्य विकास, समाजात विकासासाठी योगदान देण्याची भावना निर्माण करणे म्हणजे साक्षरता होय. महिला व पुरुषांमध्ये समानता आणण्यात साक्षरतेचे महत्वाचे योगदान आहे. तसेच शिकण्याचे कोणतेही वेळ व वय नसते. मानव आयुष्यभर हा विद्यार्थीच असतो व तो जीवनाच्या शेवटपर्यंत शिकतच असतो.अशी माहिती साक्षरता दिनानिमत्त यवतमाळ जिल्ह्यातील मारोतराव वादाफळे कृषी महाविदयालय येथील विदयार्थीनी साक्षी ज्ञानेश्वर थुटे हिने रावेरी येथील नागरिकांना दिली. यावेळी तिला प्राचार्य सह इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.