
महिला सन्मान कार्यक्रमा अंतर्गत साडीचोळी वाटपाचा कार्यक्रम संपन्न
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
.
दिग्रस तालुका रास्त भाव दुकानदार संघटनेच्या वतीने दिवाळी निमित्य महिला सन्मान व रास्त भाव दुकानदार बांधवांचा स्नेह मिलनसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.तहसील कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात कोरोना मध्ये ज्या महीला विधवा झाल्या त्यांना साडी चोळी व फराळाचे वाटपाचा कार्यक्रम रास्तभाव धान्य दुकानदार संघटनेच्या दुकानदार बांधवांचा स्नेह मिलन सोहळा संपन्न झाला.
या साडीचोळी वाटपाचा कार्यक्रमाला माजी वनमंत्री तथा विद्यमान आमदार संजय भाऊ राठोड यांच्या शुभ हस्ते यवतमाळ जिल्हा रास्तभाव दुकानदार संघटनेचे अध्यक्ष भगवंतराव राऊत यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार साहेब तसेच दिग्रसचे प्रभारी तहसीलदार सुधाकर राठोड, संताजी नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष बंडू अण्णा मात्रे, सुधीरभाऊ देशमुख,राहूल भाऊ शिंदे, तालुका रास्त भाव दुकानदार राजु भाऊ जयस्वाल शिवाभाऊ आडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होतेवे ळीं आमदार संजय भाऊ राठोड यांनी रास्त भाव दुकानदार संघटनेच्या कार्याची प्रशंसा केली व दुकानदार संघटनेच्या पाठीशी असल्याचे आश्वासन दिले. रास्त भाव दुकानदार संघटना चे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष भगवत राऊत यांनी दिग्रस ची संघटना नेहमी कार्यक्रम घेत असल्याबद्दल कौतुक केले जील्हा पुरवठा अधिकारी श्री सुधाकर पवार यांनी या प्रसंगी रास्त भाव दुकानदार बांधवांच्या अडिअडचणी जाणुन घेतल्या व वाटप यंत्रणा कशी प्रभाविपने राबवावी या साठी मोलाचे मार्गदर्शन केले. दिग्रसचे तहसिलदार श्री सुधाकर राठोड यांनीही रास्त भाव दुकानदार संघटनेने घेतलेल्या कार्यक्रमाबद्दल अभिनंदन केले व नेहमी सहकार्याचे आश्वासन दिले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार ज्येष्ठ पुंडलीकराव इंगोले यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रास्तभाव दुकानदार संघटनेचे दिग्रस तालुका अध्यक्ष प्रल्हाद कोरडे, उपाध्यक्ष नामदेव पवार,सचिव फिरोज खान, ज्योतिसिंग राठोड, नरेंद्र चव्हाण , विठ्ठल जाधव,राम राठोड, विनोद जाधव यांच्यासह रास्तभाव दुकानदार संघटनेच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
