आमदार प्रा डॉ . अशोक उईके यांनी तालुक्यातील विविध कामाचा घेतला आढावा , राळेगांव शहराकरीता होणार ४८ कोटीची अमृत पाणीपुरवठा योजना

शेतकऱ्याच्या बियाणे कृषी कर्ज वाटप समस्याचा कृषी विभागाचा घेतला आढावा , बेबंळा प्रकल्पग्रस्ताचा घेतलाआढावा ,ओबीसी सह इतर घरकुल योजनेचा आढावा

प्रतिनिधी रामभाऊ भोयर

महाराष्ट्र राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार प्रा डॉ अशोक उईके यांनी आज राळेगाव येथे नगरपंचायत येथे पाणीपुरवठा योजना तसेच कुषी कार्यालय येथे पिककर्ज बियाणे खत याचा तुटवडा संदर्भात आढावा बैठक तसेच बेबंळा प्रकल्पातील शेतकऱ्यांना मोबदला मिळणे संदर्भात आढावा घेऊन घरकूल योजनेच्या संदर्भात माहिती घेण्यात आली यावेळेस सर्वच विभागाचे अधिकारी उपस्थित होते .देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्यात नगरपंचायती सह इतर भागामध्ये अमृत योजनेच्या माध्यमातून प्रभावी पाणी पुरवठा योजना झाली पाहिजे अशा प्रकारचा संकल्प घेऊन दीड वर्षापासून या योजनेची सुरुवात महाराष्ट्रात झालेली आहे . त्याचाच एक भाग म्हणून राळेगाव नगरपंचायत ला 48 कोटींची पाणीपुरवठा योजना 2.0 अमृत योजना या नावाने मंजूर करून सर्वच परवानग्या घेऊन योजना लवकरच कार्यानित्व करण्यासाठी आज नगरपंचायत कार्यालयात शहरातील नगरसेवक नगराध्यक्ष रविद्र शेराम यांच्या सह मुख्याधिकारी अग्रवाल यांची बैठकआमदार प्रा डॉ अशोक उईके यांनी घेतली . यात नगरपंचायत राळेगांव हेच पाणीपुरवठा योजना चे पूर्ण काम पाहतील दुसरी संस्था काम पाहणार नाही शहरातील पाणी समस्या गंभीर आहे पुढेती बिकट होऊ नये यासाठी सर्वामिळून एक चांगली योजना कुठलही राजकारण न करता शहरातील नागरीका साठी आपण करू असे आमदार प्रा डॉ अशोक उईके यांनी सांगितले . हि योजना राबवितांना ५०% टक्के केंद्र सरकार ४०% टक्के राज्य सरकार आणि दहा टक्के लोकवर्गणी लागणार आहे . योजने बाबतचा प्रस्ताव संबंधीत विभागा कडे पाठविल्याचे न पने सांगितले आहे या प्रमाणे आज राळेगांव मतदार संघातून बेंबळा प्रकल्पाचा मुख्य कालवा ११३ किमी गेलेला आहे . कालव्यात ज्या शेतकऱ्याच्या जमीनी गेलेल्या आहे त्यांना मोबदला मिळाला नाही दिरंगाई का झाली या संदर्भात बेबंळा प्रकल्प अभियंत्याची बैठक घेण्यात आली . सर्वत्र घरकूला संदर्भात वादविवाद सुरु आहे . प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घरकूल योजना प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी मागेल त्याला घर देण्याचे ठरले आहे राळेगांव तालुक्यात ओबीसी समाज साठी घरकूल योजना राबविण्यात येत आहे या संदर्भात आमदार प्रा डॉ अशोक उईके यांनी अधीकारी यांची बैठक घेऊन आढावा घेतला आहे . कृषी विभागात कृषी अधिकारी यांचा सह सर्व कर्मचाऱ्याची बैठक घेऊन शेतकऱ्या चे पिक कर्ज बियाणे खताची उपलब्धता पिठ विम्या संदर्भात माहिती घेण्यात येऊन शेतकऱ्यांच्या समस्येकडे लक्ष देण्याच्या सुचना केल्या आज झालेल्या सर्व आढावा बैठकी करीता आमदार प्रा डॉ अशोक उईके यांची उपस्थिती होती त्यांच्या सोबत उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील तालूका कृषी अधिकारी जोशी गटविकास अधिकारी केशव पवार भारतीय जनता पक्षाचे पदाधीकारी यांचीही उपस्थिती होती .