प्रस्तावित मेडिकल कॉलेज वेळा येथे होण्याच्या शासकीय आदेशा विरुद्ध माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांचे आज पासून मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे आंदोलन

हिंगणघाट:- २६ जुन २०२४
हिंगणघाट साठी मंजूर झालेले शासकीय मेडिकल कॉलेज हे येथून १५ किमी अंतरावरील वेळा येथील एका खासगी व्यक्तीच्या जागेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी वर्धा यांनी शासनाला सादर केल्याने या विरोधात माजी आमदार राजू तिमांडे हे आज दि २७ जूनला मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे आंदोलनाला बसणार असल्याचे त्यांनी एका निवेदनातून कळविले आहे.
या संदर्भात मिळालेल्या वृत्तनुसार हिंगणघाट शहरात होणारे शासकीय मेडिकल कॉलेज हे येथून १५ किमी अंतरावरील मौजा वेळा येथे एका खासगी उधोगपतीची १५.९९ हे.आर जागा मंजूर करण्यात आलेली असून ह्या बांधकामाचे कंत्राटदार में. मल कंस्ट्रक्शन प्रा.ली. खामला नागपूर यांनी मौजा वेळा येथील सर्व्हे नंबर 454,455,456,458,459,460,461,470 एकूण १५.९९ हे. आर जागेच्या मंजुरी ची मागणी केलेली आहे.सदर कंपनीला श्री अजय दाऊदयाल मल या नावाने फेरफार घेण्यात आलेला असून सदर मालमत्तेचे गाव नमुना 7/12 व तहसीलदार यांचा अहवाल जिल्हाधिकारी वर्धा यांना प्राप्त झालेला आहे.
या आदेशाविरोधात शहरात संतापाची लाट निर्माण झालेली असून कोणत्याही स्थितीत शहरातील मध्यवर्ती जागेवर असलेले उपजिल्हा रुग्णालय याचं ठिकाणी हे जिल्हा रुग्णालय व मेडिकल कॉलेज व्हावे यासाठी मागील एक वर्षा पासून आंदोन करीत असलेल्या मेडिकल संघर्ष समितीत असंतोष निर्माण झालेला आहे.
शासकीय मेडिकल कॉलेजसाठी वर्धा जिल्हाधिकारी ह्यांचा वेळा येथील प्रायव्हेट जागेचा प्रस्ताव सरकारला सादर झाल्याचे एक शासकीय पत्र आज शहरात व्हायरल झाल्याने शहरात प्रचंड रोष निर्माण झालेला आहे.
हिंगणघाट शहरातील लोकांनी शहरात रोजगार निर्माण व्हावे …चांगले आरोग्य मिळावे ,शिक्षण मिळावे पूर्ण १० महिने आंदोलन चालले .वेळा चे एक पण लोक आंदोलनात सहभागी झाले नाही .राजकीय दबाव तंत्र वापरून आमदार साहेब ह्यांनी हिंगणघाट शहरातील लोकांवर केलेला अन्याय आहे .स्वतःचा आर्थिक फायदा साठी हे मेडिकल कॉलेज इतरत्र पळवले असा समज सध्या नागरिकात पसरत आहे असा आरोप माजी आमदार तिमांडे यांनी केला आहे. सरकारी दवाखानाच्या आजू बाजूला धनाढ्य व्यापारी आणि राजकीय लोकांना भविष्यात व्यापार करायला जागा उपलब्ध नाही म्हणून ते कॉलेज वेळा पळवत आहे असा आरोप राजू तिमांडे यांनी केला आहे.