
सहसंपादक : रामभाऊ भोयर
श्रमसाफल्य बहुउद्देशिय संस्था राळेगाव अंतर्गत मर्दानी खेळ असोसिएशन महाराष्ट्र राज्य संलग्नित मर्दानी खेळ असो यवतमाळ आयोजित 28 ते 30 मे2024 त्रीदिवसिय शिबिरात प्रशिक्षक राष्ट्रीय गोल्ड मेडालिस्ट दांडपट्टा, प्रितम सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना लाठी काठी, तलवार बाजी, दांडपट्टा, भाला, मुद्गल, व्यायाम योग, सिलांबम, आष्टे-डू आखाडा इ. खेळ शिकवले. शिबिरार्थिचे प्रमाणपत्र देऊन कौतुक करण्यात आले. दि. 30 मे 2024 समारोपिय कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. मोहन देशमुख , प्रमुख उपस्थिती मारोतराव कामडी, अध्यक्ष श्रमसाफल्य संस्था राळेगाव, अंकुशजी रामगडे,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विभाग प्रमुख यवतमाळ यांनी शिवकालीन खेळाचे महत्व सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.मंगेश राउत, नगरसेवक राळेगाव, प्रा अशोक पिंपरे उपस्थित होते.प्रतिमा पुजन करून गारद गायन केले व विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक सादर केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेघश्याम चांदे( मामा)यांनी केले. सुत्रसंचालन ॲड. सौ.रोशनी कामडी (वानोडे) यांनी केले. आभार प्रदर्शन पवन वर्मा यांनी केले.व्यसनमुक्ती पोस्टर प्रदर्शन केले होते. व्यसनमुक्ती शपथ यवतमाळ जिल्हा संघटक नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्यॲड. रोशनी वानोडे सौ कामडी यांनी दिली.श्री शिवाजी महाराज ध्येय मंत्र गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे यशस्वी ते करीता स्वामी विवेकानंद विचार मंच राळेगाव, शहीद क्रांतिकारी भगतसिंग संघटना, हनुमान चालीसा पाठ समिती, राजे शिवशाही महाराज बहुउद्देशीय संस्था,श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती राळेगाव, राष्टीय संयसेवक संघ प्रभात शाखा यांचे सहकार्य लाभले.
