
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथील ग्रामपंचायत च्या वतीने १८ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सविस्तर वृत्त असे १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर पर्यंत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्यात आले आहे सदर या अभियाना अंतर्गत रिधोरा येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर गावामध्ये आरोग्य शिबिर घेऊन यामध्ये गावातील सर्व महिला, पुरुष तसेच सर्वोदय विद्यालय व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली यामध्ये बीपी, शुगर, सिकल सेल या सर्व रोगांची तपासणी करून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच गावातील आरोग्य उपकेंद्राच्या परिसरात वृक्षरोपण करण्यात आले तर जनावरांना पाणी पिण्याच्या दृष्टीकोनातून रिधोरा गावालगत असलेल्या नाल्यावर वनराई बंधारा बांधण्यात आला आहे. यावेळी उपस्थित रिधोरा गावचे प्रथम नागरिक सरपंच उमेश गौळकार, राळेगाव पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी इसाळ मॅडम, पेसा समन्वयक काथवटे मॅडम , सचिव पंढरी खडसे, दिपक पवार, ग्रा.प. सदस्य अरविंद गाऊत्रे, आरोग्य विभागातील तळवी मॅडम, वाघमारे मॅडम, अंगणवाडी सेविका मीरा करपते, प्रतिभा राऊत, आशा सेविका वैशाली चौधरी, महिला बचत गटातील मंगला झुंगरे, पल्लवी जवादे, वैशाली मोहुरले, कल्याणी पंडिले व ग्रामपंचायत कर्मचारी विलास पवार, भास्कर तोडासे, राजू पंडिले, राजू गुरनुले, मंगेश शेंडे यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
