गुडीपाडव्याच्या दिवशी तास काढणे अजूनही परंपरा कायम.

माहगाव प्रतिनिधी:- संजय जाधव

संगणकीय युगामध्ये आज शेती हे आधुनिक व विशेष तंत्रज्ञान या द्वारे करण्यात येत आहे परंतु अजूनही काही प्रमाणात शेतकरी आपली शेती ही च पद्धतीने करतात व आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर शेतामध्ये तास काढण्यात येत आहे.
शेतकरी यांचं जिव्हाळ्याचे नातं
मराठी नववर्षाच्या याच दिवसापासून शेतकऱ्यांचेही शेती व्यवसयातील नववर्ष सुरु होते. रब्बी हंगाम अंतिम टप्प्यात असतानाच या नववर्षीची सुरवात केली जाते. काळाच्या ओघात शेती व्यवसयामध्ये अमूलाग्र बदल झाला आहे. या काळात शेतकऱ्यांनी काही परंपरा या बदलत्या वातावरणामध्येही कायम ठेवलेल्या आहे.
एका प्रथेनुसार पेरणी झाल्यावर रब्बी पीक काढल्याच्या आनंदात शेतकरी हा सण साजरा करतात आणि गुढीपाडव्याच्या दिवशी चांगले पीक यावे या उद्देशाने शेतकरी शेतात नांगरणी करतात अशी देखील मान्यता आहे.