घरे बांधून देणाऱ्या पंचायत समिती कर्मचाऱ्यांची निवासस्थाने देखभाल दुरुस्ती अभावी पडली ओस

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव येथील पंचायत समिती कार्यालयात कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी शासनाने बांधकाम केलेले कर्मचारी निवासस्थाने देखभाल दुरुस्ती अभावी ओस पडली आहेत.
एकेकाळी परिसरात परिपूर्ण आणि सुसज्ज निवास म्हणून याकडे पाहिले जायचे आता मात्र या ठिकाणी कोणी कर्मचारी राहत नसल्याने शासनाच्या या जागेत अतिक्रमण होताना दिसत आहे व या परिसरात खाजगी वाहने उभी केली जात आहे ठिकाणी निवासस्थान नाही म्हणून कर्मचारी जिल्ह्याच्या ठिकाणावरून अपडाऊन करतात तर काही खाजगी घरे भाड्याने घेऊन राहतात
पंचायत समिती कार्यालय मार्फत ग्रामपंचायत शासनाच्या योजनेअंतर्गत घरे बांधून देत आहेत मात्र घरे बांधून देणाऱ्या पंचायत समिती कर्मचाऱ्यांचीच घरे नादुरुस्त असताना पडझड झालेल्या घरांना दुरुस्ती करण्यासाठी निधी मिळत नाही त्यामुळे कार्यरत असलेले अधिकारी कर्मचारी हे मुख्यालय न राहता ५० ते १०० किलोमीटर प्रवास करत आपल्या सोयीनुसार कोणी यवतमाळ तर कोणी वर्धा जिल्ह्याच्या ठिकाणावरून अपडाऊन करत आहेत लाखो रुपये खर्चून बांधलेल्या निवासस्थानाची देखभाल दुरुस्ती न झाल्याने दूर व्यवस्था झाली आहे याकडे शासनाने वेळीच लक्ष देऊन निवासस्थानाची दुरुस्ती करून बांधकाम करून निवासस्थान व्यवस्थित करावीत अशी मागणी होत आहे राळेगाव शहरात असलेल्या पंचायत समिती कार्यालया मधील महत्वाची पदे असून शिक्षण विभाग, बांधकाम विभाग,पशुधन विभाग, आरोग्य विभाग,कृषी विभाग, आदी महत्वाच्या पदावर अधिकारी कार्यरत असतांना त्यांना राहण्याची निवासस्थानाला भेगा पडल्या तर काही निवासस्थानाची पडझड झाली मात्र देखभाल दुरुस्ती अभावी ओस पडली.त्यामुळे निवासस्थाने चांगली नसल्याने काही कर्मचारी रोज अपडाऊन करत आहेत.

निवासस्थानाच्या भिंतीची पडझड


जिल्हा परिषद बांधकाम विभागांनी या बाबीकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे पंचायत समिती अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी बांधण्यात आलेली निवासस्थाने देखभाल दुरुस्ती अभावी सध्या पडली आहे निवासस्थानीच्या भिंतीची पडझड झाली त्यामुळे प्रशासनाने व कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी निवासस्थाने बांधकाम करावी अशी मागणी होत आहे.