वणी ठाणेदार ची हकालपट्टी करा पत्रकारांची निवेदनातून मागणी

प्रतिनिधी:नितेश ताजने, वणी

वणी येथील ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांच्या ठेपाळलेल्या कारभारामुळे शहरातील कायदा सुव्यवस्था अत्यंत डबगाईस आल्याने दररोज शहरात चोऱ्या घरफोड्या वाढल्या आहे आज ता.१२ रोजी पहाटे ५ वाजता घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराने पत्रकार आसिफ शेख यांचेवर केलेल्या जीवघेण्या हल्यामुळे पत्रकार संघटना चांगल्याच संतप्त झाल्या आहेत.
वणीतील असंख्य पत्रकार आज शासकीय विश्राम गृहामध्ये एकत्रित येऊन ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांच्या विरुद्ध घोषणाबाजी करीत पोलीस उपअधीक्षक संजय पूजलवार यांच्या कार्यालयात जाऊन ठाणेदार महल्ले यांच्या बदलीची मागणी केली. व बदली न झाल्यास पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या कार्यालय यवतमाळ येथे जाऊन निषेध नोंदविण्याचा इशारा दिला तसेच वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजयरेड्डी बोदकुरवार यांची भेट घेतली असता आमदार बोदकुरवर यांनी पोलीस महानिरीक्षक यांना भ्रमणध्वनीने संपर्क केला असता आज तात्काळ पोलीस अधिक्षक भुजबळ यांना ५ वाजेपर्यंत वणीत पाठवित असल्याचे सांगितले असता पोलीस अधीक्षक भुजबळ हे काय कारवाई करतील याकडे वणीकरांचे लक्ष लागले आहे.