प्रभाग क्रं 26 च्या नगरसेविका सौ. हर्षदा संदीप गायकर यांच्या निधीतून 10 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशीन उपलब्ध

नाशिक/कोरोना महामारी संकट काळात रुग्णांची वाढती संख्या व अपुरी आरोग्य व्यवस्था तसेच ऑक्सिजनचा तुटवडा लक्षात घेता प्रभाग क्रं २६ मधील नगरसेविका सौ. हर्षदा संदीप गायकर यांच्या स्वेच्छा निधीतून ५ लिटर क्षमता असलेले 10 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशीन नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे.
आज पहिल्या टप्प्यात 2 मशीन जनतेच्या सेवेत उपलब्ध झालेले आहे. हे मशीन ज्यांची ऑक्सिजन लेवल ८०/८२ पर्यंत असलेल्या रुग्णांना हॉस्पिटल मधे जागा उपलब्ध होई पर्यंत ८ ते १० तास घरीच ऑक्सिजन पातळी टिकविण्यासाठी व वाढविण्यासाठी अत्यंत उपयोगी व जीवनदायी ठरत आहे. त्यामुळे गरजू रुग्णांनी श्री. संदीप गायकर यांच्याशी
८७९३६९४०१३ या क्रमांका वर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.