
प्रतिनिधी:: प्रवीण जोशी
यवतमाळ
ढाणकी शहरातील मुख्य मंदिर ग्रामदैवत असलेल्या ठिकाणी एकूण जगातील सात चिरंजीवांपैकी एक असलेले बलोऊपासक अशी ख्याती प्राप्त श्री हनुमंतराय यांचा जन्म उत्सव अगदी उल्हास साथ व आनंदाने साजरा करण्यात आला असून यावेळी श्री हनुमंतरायांची मूर्ती विलोभनीय दिसत होती अनेकांना नवसाला पावणारा श्री हनुमंतराय अशी ख्याती असलेल्या व मनोकामना पूर्ण होतात अशी भक्तांची श्रद्धा ढाणकी शहरातील श्री हनुमंत रायांची कीर्ती आहे.मध्यरात्र झाल्यानंतर पुरोहितांनी शंखध्वनी करून अभिषेकाला सुरुवात केली यावेळी अभिषेकासाठी भक्तांचा जनसागर उसळला होता रुचकीच्या फुलाची व वड्याची माळ घालून हनुमंतरायांना नैवेद्य दाखवून चरणी भक्त लिन झाले यावेळी गेल्या काही दिवसांपासून चालू असलेल्या रंग रंगोटीच्या कामामुळे व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मंदिरावर टाकलेली रंगबिरंगी विद्युतरोषणाई मुळे मंदिर परिसर रात्रप्रहरी अधिकच लख्ख प्रकाश झोतात दिसत होते जणू काही रामजन्मभूमीच्या महिमा दूरचित्रवाणीवर दाखवत होते तसाच ढाणकी शहरातील श्री हनुमंतराय मंदिर व आजूबाजूचा परिसर वाटत होता आधुनिक रंगरंगोटीची संकल्पना होती विष्णुदासजी वर्मा यांची व ती सत्यात उतरवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते गजानन गंजेवाड यांनी पण तितकीच मोलाची मदत यावेळी केली व श्रीहनुमंतराव चरणी आपली सेवा अर्पण केली तसेच श्रीनाथ येरावार हे ज्येष्ठ नागरिक असून सकाळच्या रामप्रहरापासून ते कार्यक्रम समाप्ती होईपर्यंत आपली सेवा दिली ज्येष्ठ नागरिक असून सुद्धा ही विशेष बाब म्हणावी लागेल आणि उल्हास दिगंबर येरावार यांनी श्री चरणी ५००१मंदिर व्यवस्थापनाला देणगी दिली श्री हनुमंतराय हे शक्तीची बलोपासना म्हणून अनेक जण या ठिकाणी लिन होतात तसे श्री राम भक्त हनुमंताच्या कडे असलेले निष्कपटता ऋतुजा आणि अलौकिक अशी विद्वत्ता व निर्मळ व गंगेसारखे स्वच्छ चरित्र स्पृहणीय आहे.श्रीहनुमंतरायाच्या अत्यंत प्रखर व मंगल चारित्र्यातील सदगुण सगळ्याच्या जीवनात यावा व खरी श्रद्धा प्रवर्धित व्हावी अशी अपेक्षा एवढे सगळे अंजनी पुत्र हनुमंताकडे असेल म्हणून हनुमंतरायाला भक्तश्रेष्ठ पदवी दिलेली आहे नंदी शिवाय शिवालय नाही तसेच श्री हनुमंता शिवाय श्रीराम नाही ही एक संकल्पना असून ती तितकी सत्य आहे!! जय जय रघुवीर समर्थ!!
