
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
खैरी वडकी परिसरात शनिवारपासून ऐन रब्बी हंगाम व नवरात्र मध्येच ब्रेकर पोल फुटल्यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. वीज पुरवठा वडकी वीज केंद्रात येणाऱ्या ४८ गावात शनिवारपासून वरचेवर खंडित होत असून ब्रेकर पोलची दुरुस्ती न झाल्यामुळे सर्व ४८ गावांना सारखे वीज संकटाला सामोरे जावे लागत आहे. ऐन रब्बी हंगाम व नवरात्र मधी रात्रंदिवस सारखा विजपुरवठा खंडीत होण्याचे प्रकार वाढल्यामुळे महावितरण कंपनीच्या या हलगर्जीपणामुळे परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत.
वडकी वीज केंद्र मधून शनिवारपासून दिवस रात्र सतत वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार सुरू असून त्यामुळे वडकी वीज केंद्रातील ४८ गावांना खंडित विजयपुरवठ्याचा त्रास सहन करावा लागत आहे . आता नवरात्र महोत्सव सुरू असून शेतकऱ्यांचे रब्बी पीक घेण्याचे दिवस असून रब्बी पिक हंगामाच्या तोंडावरच शेतकऱ्यांना व देवी भक्तांना या वीज संकटाचा त्रास होत आहे. वडकी विज केंद्रात याबाबतीत विचारणा केली असता तीन ब्रेकर पोल पैकी एक ब्रेकर पोल फुटला असल्यामुळे हा त्रास होत असल्याचे समजते. याबाबतीत वडकी वीज केंद्रातून वरिष्ठाकडे रीतसर तक्रार केली असल्याचे समजते . तीन पैकी एक ब्रेकर पोल तुटला असल्यामुळे भार वाढून वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे . मात्र याकडे वरिष्ठ स्तरावरून तीन-चार दिवसापासून कोणतीही दखल घेतली असल्याचे दिसत नाही.
तेव्हा नवरात्र बरोबर शेतकऱ्यांचा रब्बी हंगामाला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांना रब्बी पिक घेण्यासाठी ओलीत करण्याची आवश्यकता आहे परंतु वारंवार होणाऱ्या वीज खंडामुळे शेतकऱ्यांना ओलीत करणे शक्य होऊ राहिले नाही आहे तरी वडकी टेशन मधून वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत सुरू करण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून दखल घ्यावी व वडकी सबस्टेशन मधील वीजपुरवठा सुरळीत करून सब स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील शेतकऱ्यांचे व गावकऱ्यांचे समाधान करावे अशी वडकी सब स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ४८ गावातील शेतकरी बांधवां व नागरिकाकडून मागणी होत आहे .
