चार ट्रक सह ४९ दुधाळ गाई पकडल्या,वडकी पोलिसांची मोठी कारवाई, जवळपास एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त.

वडकी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार विनायकराव जाधव साहेब यांची मोठी कारवाई

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

    उत्तर प्रदेशातून बेंगलोर येथे निर्दयपणे चार ट्रक मधून कोंबून घेऊन जाणाऱ्या एकुण ४९ दुधाळ गाई सह पंधरा बछड्यांना वडकी पोलिसांनी पकडून सर्व जनावरांना गोरक्षणाच्या ताब्यात देण्यात आले.हि कारवाई हनुमान जयंतीच्या दिवशी दुपारी बारा वाजता दरम्यान करण्यात आली.
           घाटंजी येथील बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे वडकी पोलिस स्टेशनचे ठाणेदार विनायक जाधव यांनी हि कारवाई केली असून या प्रकरणी जवळपास आठ ते दहा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांचे विरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले.सदर ट्रक मध्ये जर्शी तसेच होस्टन व साहिवाल जातीच्या गाई होत्या.त्या गाईंची बाजारात लाख ते दिड लाख रुपये किंमत असल्याचे सांगितले जाते.हि सर्व दुधाळ जनावरे अतिशय निर्दयपणे व कुठल्याही प्रकारची चारा पाण्याची व्यवस्था न करता क्षमतेपेक्षा जास्त जनावरांना कोंबून नेत असल्याने हि कारवाई करण्यात आल्याची माहिती वडकी पोलिस स्टेशनचे ठाणेदार विनायक जाधव यांनी दिली.या कारवाईत चार ट्रक सह दुधाळ गाई असा जवळपास एक कोटी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.हि कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.दिलीप भुजबळ, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात वडकीचे ठाणेदार विनायकराव जाधव,चालक विनोद नागरगोजे, विलास जाधव व दिपक वांड्रस्वार यांनी केली.