रुग्ण सेवेसाठी बिरसा ब्रिगेडचे नांझा येथे आरोग्य शिबिर

सहसंपादक : रामभाऊ भोयर

डॉ.अरविंद कुळमेथे बिरसा ब्रिगेड महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांच्या नेतृत्वात ग्रामीण जनतेसाठी गाव गावात आरोग्य शिबिराचे आयोजन होत आहे आज दिनांक २० ऑगस्ट रोजी नांझा येथे आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते, उद्घाटना प्रसंगी डॉ.अरविंद कुळमेथे जनतेला मार्गदर्शन करताना सांगितले की कोणीही घरात राहून घुसून मरण्याची आवश्यकता नाही. आपल्या आजारा बाबत आम्हाला सांगा, आम्ही त्यावर नक्कीच इलाज करू. सर्वच बिमाऱ्यावर इलाज होऊ शकतात, आजारावर दुर्लक्ष करू नका, वेळेवर इलाज करा. आमच्या बिरसा ब्रिगेडचे कार्यकर्ते गावोगावी आहेत त्यांना सांगा,ते आम्हाला सांगून निश्चितच पुढील इलाज करून घेतील असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बिरसा ब्रिगेडचे राज्य संघटक प्रा. वसंत कनाके व आरोग्याच्या शिबिरात अतिथी म्हणून जनतेला आरोग्याची तपासणी करण्यासाठी प्रमुख अतिथी डॉ.प्रवीण चव्हाण (एम एस ऑर्थो), डॉ. आकाश डुरके (मेडिकल ऑफिसर ),डॉ. कमलेश पेंदोर (मेडिकल ऑफिसर) यांनी जनतेची आजारावर तपासणी व विशेष चर्चा करून २५० रुग्णांवर औषध उपचार केला. या शिबिरात आलेल्या रुग्णांना औषधी देण्यात आले. या शिबिराला बिरसा ब्रिगेडचे कार्याध्यक्ष उमेश येरमे, समीर वडे, रोशन घोडाम, अल्केश कन्नाके सेवेसाठी हजर होते.
नांझा गावातीतलं बिरसा ब्रिगेड आरोग्य शिबिराचे आयोजन किशोर हस्तभांडे, सुनील परचाके, आकाश भलावी, विनोद वेट्टी, अनिल मेश्राम, आदित्य वेट्टी, चंद्र शेळके, गजानन किनाके, अमोल भलावी, शिवा आत्राम, याचे सहकार्य लाभले
.