बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ढाणकी येथील पोलीस चौकी येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न.


ढाणकी प्रतीनिधीं:प्रवीण जोशी


काल दिनांक सात सप्टेंबर रोजी बुधवारला बिटरगाव पोलीस स्टेशन तर्फे ढाणकी येथील पोलीस चौकीला शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली यावेळी या कार्यक्रमाला शहरातील अनेक प्रतिष्ठित व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. त्यामध्ये सुरेश लालजी जयस्वाल अध्यक्ष ढाणकी नगरपंचायत, संजय कुंभरवार, आनंदराव चंद्रे रमण रावते, अनिल येरावार खाजाभाई कुरेशी, अजिज खान पठाण, इत्यादी मान्यवर उपस्थित होते या सर्वच उपस्थित मान्यवरांनी आपले म्हणणे मांडताना सांगितले की कायद्याच्या चाकोरीत राहून अत्यंत आनंदाने व उत्साहाने हा गणेशोत्सव आणि इतर उत्सव सण साजरे करावे परंतु आपल्याकडून हे उत्सव साजरे करताना कोणतेही गालबोट लागणार नाही याची खबरदारी घ्यावी गेली दोन वर्ष कोरोनाच्या संकटामुळे आपण हे उत्सव साजरे करू शकलो नाही.
याची जाणीव आम्हाला असून आपल्या सर्वांच्या भावनांचा आधार करतो आपणही प्रशासनास मदत करावी असे आव्हान उपस्थित मान्यवरांनी केले.तर बिटरगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप भोस म्हणाले सध्या सायबर चे गुन्हे मोठ्या प्रमाणात घडत असून याबाबत सर्वांनी सतर्क असायला पाहिजे कोणत्याही धर्माच्या भावना दुखावल्या जाणार नाही याची दक्षता घ्यावी असे यावेळी त्यांनी उपस्थित असलेल्या सर्व गणेश मंडळाच्या उपस्थित कार्यकर्त्यांना सांगितले.