
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील घरकुलाचा पहिला हप्ता मिळाल्यानंतर अनेकांनी बांधकाम सुरु केले,आपण राहत असलेले घरे पाडून नवीन बांधायचे या लोभापोटी आपली राहण्याची व्यवस्था कशी बशी बाहेर करून आपल्या संसाराचा राडा चालवीत असताना दुसरा किंवा तिसरा असा निधी अजून पर्यंत प्राप्त झाला नसल्याने आपला संसार भर पावसाळ्यात उघड्यार थाटून असल्याने पुढील निधीच मिळत नसल्याने गरीब लाभार्थ्यांना ऐन पावसाळ्यात उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे.
केंद्र सरकार पुरस्कृत घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरीत करण्यात आला. परंतु त्यांनतर अपेक्षित हप्त्याला ब्रेक लागल्यामुळे ऐन पावसाळ्यात लाभार्थी उघड्यावर पडल्याचे चित्र राळेगाव तालुक्यात दिसून येत आहे. राळेगाव तालुक्या करिता 2629 लाभार्थी करिता योजना असल्याने सर्वानाच मंजुरी देण्यात आली होती, त्यातील पहिला हप्ता रू. 15000 हा 2491 लाभार्थ्यांना मिळालेला असून दुसरा हप्ता हा 1122 लाभार्थ्यांना मिळाला तर तिसरा हप्ता हा 505 लाभार्थ्यांना मिळाला असून पुढील हप्ता निधी हा कोणत्याही लाभार्थ्याला अजून पर्यंत प्राप्त झालेला नाही हे सर्व असताना तालुक्यातील पूर्ण बांधकाम 482 लाभार्थ्यांचे झाले असून अपूर्ण असलेले निधी अभावी बांधकाम हे 2147 लाभार्थी हे आज रोजी उघड्यावर आपला संसार करीत असून पहिला हप्ता मंजूर असून 138 लाभार्थ्यांना अजून मिळालेला नाही तर दुसऱ्या हप्ता हा 1369 लाभार्थ्यांना मिळालेला नसल्याने केंद्राकडून निधीची पूर्तता कधी होणार व घरकुलाचे अर्धवट बांधकाम कधी पूर्ण होणार हा सध्या तालुक्यातील लाभार्थ्यांना प्रश्न पडलेला आहे. पहिल्या हप्त्याच्या १५ हजार रुपयातून तोडकेमोडके घर जमिनदोस्त करत
जोता बांधलेले अनेक लाभाथों आज रोजी त्रस्त झाले आहे. सरकारचा या योजना पूर्ण होत नसताना इतर योजनांचे आमिष दाखवून जनतेस संभ्रमात पाडू नये असा सूर सध्या दिसून येत आहे.
