राळेगांव येथे वंचित बहुजन महिला आघाडी कार्यकारीणी गठित व सत्कार समारंभ

राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर

राळेगांव येथील बुधवार दि.15/2/2023 रोजी शासकीय विश्रामगृह राकेगाव येथे वंचित बहुजन आघाडीची तालुका स्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये यवतमाळ पूर्व च्या महीला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा मा. धम्मावतीताई वासनिक मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाध्यक्ष मा. लोळगे साहेब, महासचिव कांबळे साहेब व महीला आघाडीच्या यवतमाळ शहराध्यक्षा मा. शिरसाठ मॅडम, सावते मॅडम यांच्या प्रमुख उपस्थीतीत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा शाल व पुष्यगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी राळेगांव तालुका महीला अध्यक्षा म्हणून सौ विभालाताई अमोलराव पुडके यांची तर तालुका महीला महासचिव म्हणून सौ सुरेखाताई सुरज वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली. सौ. लीलाताई, सौ. अनिताताई भरणे, उपाध्यक्ष सौ. जयाताई ठाकरे, सहसचिव सौ. प्रतिक्षा वरटकर, उपाध्यक्षा सुनीताताई तागडे, दुर्गाताई जावळेकर सहसचिव, सौ. सुनीता अनंतराव दिवे, सचिव, रंजनाताई सावध सहसचिव, सौ निशा भरणे संघटक, सौ किरण वेले सहसचिव, सौ. प्रियंका गोटे उपाध्यक्ष, यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी फुले, शाहु आंबेडकरी चळवळ पुढे नेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता वंचित घटकातील जे काही राजकीय सत्तेपासून वंचित घटक आहेत.

त्यांना सत्तेत वाटा मिळण्याकरीता श्रधेय बाळासाहेब आंबेडकर यांच्यान मागे खबीरपणे उभे राहाणार असल्याचे मत नवनिर्वाचित सदस्यांनी व्यक्त

केले.

यावेळी राळेगांव विधानसभा क्षेत्राचे विधानसभा अध्यक्ष मा. डॉ ओमप्रकाश फुलमाळी, शहर अध्यक्ष दिपक भाऊ आटे, तालुका अध्यक्ष विकासभाऊ मून, महासचिव प्रकाश कळमकर, संघटक भगवानजी तागडे, सहसचिव चंद्रगुप्ताजी भगत, निलेश कांबळे, सौ मेघा कांबळे वर्धा, सौ. डॉ. अश्वीनीताई फुलमाळी, वनकर ताई, उमेश कांबळे प्रसिध्दी प्रमुख तुळशी राम भरने मनोहर सावध, इत्यादी मान्यवर उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन यवतमाळ जिल्हा पूर्व चे महासचिव शिवदासजी कांबळे यांनी केले तर प्रास्तावीक ता. अध्यक्ष विकास मुन योनी केले. आभार प्रदर्शन शहर अध्यक्ष दिपकभाऊ आहे यांनी केले. शेवटी वंचित बहुजन आघाडी व शिवसेना युती (ठाकरे गट) युतीचा विजय असो च्या जयघोषात कार्यक्रमाची सांगत करण्यात आली.